Breaking

Monday, April 12, 2021

रुग्णवाहिकांच्या तुटवड्यावर प्रशासनाचा 'असा' तोडगा https://ift.tt/3uENRmO

म. टा. प्रतिनिधी, करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना ऑक्सिजन बेड, इंजेक्शन, लस या सर्वच गोष्टींचा तुटवडा निर्माण होत आहे. यातच आता रुग्णवाहिकांची देखील भर पडली आहे. त्यावर प्रशासनाने काळ्या-पिवळ्या टॅक्सींचा वापर रुग्णवाहिका म्हणून करण्यास सुरुवात केली आहे. करोनाबाधित रुग्णांसह अन्य रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी काळ्या-पिवळ्या ओम्नी टॅक्सींचा सर्रास वापर करण्यात येत आहे. शहरात प्रवासी भाडे मिळवणे दुरापास्त असताना रुग्णालयाकडून ठरलेले उत्पन्न मिळत आहे. यामुळे टॅक्सीचालक आनंदात आहेत. मात्र सुविधा नसलेल्या या काळ्या-पिवळ्या रुग्णवाहिकेतून दवाखान्यात नेताना रुग्ण दगावला तर त्याला कोण जबाबदार, असा प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. वाचा: मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, पालघर, नवी मुंबई या सर्वच एमएमआर क्षेत्रात रुग्णांच्या वाहतुकीसाठी काळ्या-पिवळ्या टॅक्सींचा वापर होतो. टॅक्सींच्या पुढील काचेवर 'आपत्कालीन सेवा' असा बोर्ड लावण्यात येतो. करोनारुग्णांसह अन्य रुग्णांची ने-आण देखील अशाच प्रकारच्या गाड्यांतून होते. अपुऱ्या रुग्णवाहिकांवर प्रशासनाने काढलेल्या या तोडग्यावर रुग्णांच्या नातेवाईकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. उपलब्ध सर्वच रुग्णवाहिकांचा वापर रुग्णांची ने-आण करण्यासाठी होतो. एखाद्या वेळी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यास काळ्या-पिवळ्या टॅक्सींमधून रुग्णांना रुग्णालयात पाठवले जाते. याबाबत रुग्णालयांकडे किंवा रुग्णालय चालवणाऱ्या महापालिका तसेच सरकारी यंत्रणांकडे कोणतेही उत्तर नसल्याचे वास्तव आहे. वाचा: करोनाबाधितांच्या संख्येत रोज हजारोंनी वाढ होत आहे. करोनाबाधित व्यक्तींची कोणत्याही सुरक्षिततेशिवाय वाहतूक होत असल्याने संसर्ग पसरण्याचा धोका सर्वाधिक असतो. हे माहित असूनही प्रशासनाकडून याच पद्धतीने वाहतूक करण्यात येत असल्याने सामान्य नागरिकांमधून देखील आश्चर्य व्यक्त होत आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2Qo0MuM

No comments:

Post a Comment