Breaking

Sunday, April 11, 2021

मृत्यूच्या दारात असलेल्या नक्षलवाद्याला गडचिरोली पोलिसांनी वाचवलं! https://ift.tt/3uFCFq4

गडचिरोली जिल्ह्यात जंगल परिसरात २९ मार्च रोजी झालेल्या चकमकीत नक्षली नेता भास्कर हिचामी याच्यासह पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलाला मोठं यश मिळालं होतं. यावेळच्या चकमकीत जखमी झालेल्या आपल्या साथीदाराला सोडून इतर नलक्षवादी पळाले होते. जखमी अवस्थेत अटक करण्यात आलेल्या या नक्षलवाद्यावर वेळीच उपचार करून पोलिसांनी त्याला जीवदान दिलं आहे. वाचा: जखमी नक्षलवादी कुठेतरी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी आसपासच्या गावात शोधमोहीम राबविली. यात टिपागड डिव्हीसी किशोर कवडो पोलिसांचा हाती लागला. गावातील एका नक्षल समर्थकाच्या घरी किशोर कवडो लपला होता. त्याच्या पायाला गोळी लागली होती. पोलिसांनी गावाला घेराव घालत त्याला ताब्यात घेतले. प्राथमिक उपचार करून नागपूर येथील अतिदक्षता विभागात दाखल केले होते. शस्त्रक्रियेनंतर त्याची प्रकृती स्थिर आहे. मृत्यूच्या दारात असलेल्या जहाल नक्षलवाद्याला जीवनदान दिल्याबद्दल गडचिरोली पोलिसांच्या संवेदनशीलतेचं कौतुक होत आहे. वाचा: रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली. पोलिसांनी नक्षल समर्थक गणपत कोल्हे याला या प्रकरणात अटक केली आहे. जखमी नक्षल किशोर कवडो याच्यावर १६ लाख रुपयांचे बक्षीस होते. विविध नक्षल गुन्हे व जाळपोळ प्रकरणात पोलिसांना किशोर हवा होता. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3g3C7WQ

No comments:

Post a Comment