नवी दिल्ली : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते यांचा मुलगा यांचं करोना संसर्गानं निधन झालंय. सीताराम येचुरी यांनी स्वत: गुरुवारी सकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही दु:खद माहिती दिली. ३५ वर्षीय आशिष येचुरी करोना संक्रमित आढळल्यानंतर त्यांच्यावर दिल्लीच्या एका रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या दोन आठवड्यांपासून ते मेदांता रुग्णालयात दाखल होते. 'आज सकाळी मी माझा मोठा मुलगा आशिष युचेरी याला कोविड १९ संक्रमणामुळे गमावलं, हे सांगताना अत्यंत दु:ख होतंय. ज्यांनी आमची आशा जिवंत ठेवली तसंच आमच्यासोबत उभ्या राहिलेल्या डॉक्टर, नर्स, फ्रंटलाईन हेल्थ वर्कर्स, सॅनिटायझेशन वर्कस या सगळ्यांचेच मी आभार मानू इच्छितो' असं सीताराम येचुरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. 'दु:खाच्या या प्रसंग आमच्या संवेदना आशिष यांची पत्नी स्वाती, बहीण अखिला आणि आई-वडील सीताराम-इंद्राणी यांच्यासोबत आहेत', असं सीपीएम पोलीत ब्युरोनं म्हटलंय. राजधानी दिल्लीत मात्र करोना संक्रमणाचा प्रश्न गंभीर बनलाय. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत एव्हाना ९ लाख ३० हजार १७९ रुग्ण आढळलेत तर तब्बल १२ हजार ८८७ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. सध्या दिल्लीत ८५ हजार ३६४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3tGkhNz
No comments:
Post a Comment