Breaking

Monday, April 19, 2021

महिला रुग्णाला घेऊन पुण्याला जाताना अॅम्ब्युलन्स रस्त्यालगत थांबवली, अचानक... https://ift.tt/3x9MnmQ

म. टा. प्रतिनिधी, : गंभीर महिला रुग्णाला उपचारासाठी पुण्याला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेची सोमवारी रात्री (ता. संगमनेर) येथून चोरी झाली. एका हॉटेलसमोर चालक आणि नातेवाइक खाली उतरले असता, चोरट्याने आतील रुग्णासह रुग्णवाहिका चोरून नेली. काही तासांतच पोलिसांनी गुन्ह्याचा तपास लावून येथून रुग्णवाहिका आणि आरोपीला ताब्यात घेतले. रुग्णाला उपचारासाठी पुण्याला पाठवण्यात आले. यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री रुग्णवाहिका चालक योगेश म्हाळू रोंगटे (रा. कवडदरा, नाशिक) एक महिला रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना घेऊन महामागार्वरून पुण्याकडे निघाले होते. रात्री साडेदहाच्या सुमारास घारगाव येथे एका हॉटेलसमोर रुग्णवाहिका उभी करून चालक पार्सल आणण्यासाठी गेला. त्यावेळी रुग्णाचे नातेवाइकही लघुशंकेसाठी खाली उतरले. ते सर्व जण जेव्हा परत आले, त्यावेळी रुग्णवाहिका जागेवर नव्हती. त्यामुळे चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांशी संपर्क केला. घारगाव पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. नाकाबंदी करून या मार्गावरील पोलिसांना माहिती देण्यात आली. काही वेळानंतर संगमनेर पोलिसांना ही रुग्णवाहिका शहारातून जाताना दिसली. त्यांनी ती ताब्यात घेऊन घारगाव पोलिसांना माहिती दिली. घारगावचे पोलीस तातडीने संगमनेरला गेले. त्यांनी रुग्णवाहिका आणि आरोपी वैभव सुभाष पांडे याला ताब्यात घेतले. रुग्णवाहिकेतील महिला सुरक्षित होती. त्यांना उपचाराची गरज असल्याने पोलिसांनी ही रुग्णवाहिका लगेच चालक रोंगटे याच्या ताब्यात दिली. तो रुग्णाला घेऊन पुण्याला रवाना झाला. त्यानंतर त्याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी पांडे याच्याविरोधात रुग्णवाहिका चोरीचा आणि महिला रुग्णाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्याला अटक करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत चोरीच्या उद्देशाने त्याने हे कृत्य केल्याचे आढळून आले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत. घारगावचे पोलीस निरीक्षक सुनिल पाटील तसेच राजेंद्र लांघे, प्रमोद चव्हाण, हरिश्चंद्र बांडे यांनी तातडीने पावले उचलल्याने काही वेळातच रुग्णवाहिकेचा शोध लागला. याशिवाय रुग्णाला पुढील उपचारासाठी तातडीने घेऊन जाता आले. आरोपी सध्या घारगाव पोलिसांच्या ताब्यात असून, त्याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3dzzCda

No comments:

Post a Comment