नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांतील देशातील करोना आकडेवारीवर नजर टाकली तर देशात दररोज दाखल होणाऱ्या करोना कमालीच्या वेगानं खाली घसरताना दिसून येतोय मात्र याच वेळेस मृतांच्या संख्येत मात्र दिवसेंदिवस होणारी वाढ चिंतेत भर टाकणारी आहे. मंगळवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात सोमवारी (१७ मे २०२१) २ लाख ६३ हजार ५३३ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर याच २४ तासांत तब्बल ४ लाख २२ हजार ४३६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. एका दिवसात ४३१९ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याचसोबत, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ५२ लाख २८ हजार ९९६ वर पोहचलीय. तर आतापर्यंत देशात एकूण २ लाख ७८ हजार ७१९ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. मात्र, देशात आत्तापर्यंत २ कोटी १५ लाख ९६ हजार ५१२ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. देशात सध्या ३३ लाख ५३ हजार ७६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
- एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : २ कोटी ५२ लाख २८ हजार ९९६
- एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : २ कोटी १५ लाख ९६ हजार ५१२
- उपचार सुरू : ३३ लाख ५३ हजार ७६५
- एकूण मृत्यू : २ लाख ७८ हजार ७१९
- करोना लसीचे डोस दिले गेले : १८ कोटी ४४ लाख ५३ हजार १४९
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3wjdquF
No comments:
Post a Comment