
नवी दिल्ली : यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आणि पश्चिम बंगालसहीत अनेक राज्यांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारी सायंकाळी दबावक्षेत्रात चक्रीवादळानं भीषण स्वरुप धारण केलं. LIVE अपडेट :
- ओडिशा : यास चक्रीवादळाचं तांडव सुरू झालंय. ओडिशाच्या भद्रक जिल्ह्यात वेगाच्या वाऱ्यांसोबत मुसळधार पाऊस सुरू आहे.
- आणि ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यांच्या भागात चक्रीवादळामुळे नारळाच्या झाडांहून अधिक उंच लाटा थैमान घालताना दिसत आहेत.
- पश्चिम बंगाल : कोलकातामध्येही पाऊस सुरू आहे
- 'यास' चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल, ओडिशा, कर्नाटकचा तटीय भाग, , आणि बिहारच्या काही भागांत पावसाची शक्यता आहे.
- यास चक्रीवादळाच्या 'लँडफॉल'पूर्वी (जमिनीला धडक) या वादळाचे परिणाम दिसून येऊ लागलेत. पश्चिम बंगालच्या नॉर्थ २४ परगना जिल्ह्यात बॅरकपूरमध्येही जोराच्या वाऱ्यांसोबत मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू आहे.
- यास चक्रीवादळाचा परिणाम झारखंडवरही दिसून येतोय. हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज आणि उद्या झारखंडच्या काही भागांवर हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस तर काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3viJsGW
No comments:
Post a Comment