Breaking

Saturday, May 22, 2021

माउंट एव्हरेस्टवरही करोनाचा कहर; १०० जण बाधित झाल्याचा दावा https://ift.tt/2RD6cTm

काठमांडू: जगभरात करोना महासाथीने थैमान घातले असतानाच आता जगातील सर्वोच्च हिमशिखर असणाऱ्या एव्हरेस्टवरही करोनाच्या विषाणूने चढाई केल्याचे चिंताजनक चित्र शनिवारी समोर आले. यंदाच्या एव्हरेस्ट मोहिमेतील गिर्यारोहक व त्यांच्या सहायक वर्गापैकी किमान १०० जणांना या विषाणूची लागण झाली असल्याची माहिती लुकास फर्टेनबॅश या ऑस्ट्रेलियन गिर्यारोहक व मार्गदर्शकाने एपीआय या वृत्तसंस्थेला दिली. नेपाळच्या सरकारी सूत्रांनी मात्र ही बाब फेटाळली आहे. एव्हरेस्टवर करोनाचा उद्रेक झाल्याने लुकास यांनी गेल्या आठवड्यात ही मोहीम मध्येच सोडून दिली होती. 'आणखी एक विदेशी मार्गदर्शक व सहा नेपाळी शेर्पांना या विषाणूची लागण झाली आहे. याशिवाय करोनाबाधित असल्याचे निश्चित झालेल्या गिर्यारोहक व त्यांच्या सहायकांची संख्या किमान १०० आहे. हा आकडा दीडशे वा दोनशेपर्यंतही जाऊ शकतो. यामध्ये गिर्यारोहक, बचाव पथकातील सहकारी, विमासंबंधी कर्मचारी, डॉक्टर आदींचा समावेश आहे, असे ते म्हणाले. या सर्वांचे पॉझिटिव्ह अहवाल उपलब्ध असल्याने हा दावा सहज सिद्ध करता येऊ शकेल,' असेही त्यांनी सांगितले. वाचा: या मोहिमेच्या तळाच्या तंबूतदेखील अनेक जण आजारी असल्याचे दिसत आहे. अनेक जण सतत खोकत असल्याचे आवाज कानी पडतात, अशी माहितीही त्यांनी दिली. गिर्यारोहणाशी संबंधित असणाऱ्या सरकारी प्रशासनाने मात्र या दाव्याला पुष्टी दिलेली नाही. मागील वर्षी करोना महासाथीच्या आजारामुळे एव्हरेस्ट मोहिमेवर नेपाळ सरकारने बंदी घातली होती. वाचा: यंदा केवळ ४०८ परवाने नॉर्वेतून येथे आलेला एक गिर्यारोहक एप्रिलच्या अखेरीस करोनाबाधित झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्याने तातडीने मायदेशी प्रयाण केले. करोनाच्या उद्रेकामुळे गेल्या वर्षी ही मोहीम रद्द करण्यात आली होती. नेपाळ सरकारने यंदाच्या मोहिमेसाठी केवळ ४०८ विदेशी गिर्यारोहकांना परवाने दिले आहेत. चीनकडून ‘लाइन ऑफ सेपरेशन’ चीनकडील बाजूने ‘एव्हरेस्ट’वर येणाऱ्या गिर्यारोहकांना करोनाची लागण होऊ नये, यासाठी चीनने एव्हरेस्टवर ‘लाइन ऑफ सेपरेशन’ चा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेतला होता.करोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी चीनच्या बाजूने इतर गिर्यारोहकांना चढाई करण्यास मनाई करण्यात आली आहे. केवळ चीनमधील गिर्यारोहकांनाच या वर्षी एव्हरेस्टवर चढाई करण्यास परवानगी आहे. चीनच्या बाजूने या वर्षी २१ जण एव्हरेस्ट मोहिमेसाठी निघणार आहेत. शिखरमाथ्यावर नेपाळ आणि चीनचे गिर्यारोहक एकत्र येत असतात. तेव्हा शिखरमाथ्यावरच चीनने ही ‘लाइन ऑफ सेपरेशन’ आखण्याचा निर्णय घेतला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2QIIrZH

No comments:

Post a Comment