Breaking

Friday, May 28, 2021

देशात एका दिवसात १.७३ लाख रुग्ण, गेल्या ४५ दिवसांतला निचांक https://ift.tt/2SECcXC

नवी दिल्ली : शनिवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात शुक्रवारी (२८ मे २०२१) १ लाख ७३ हजार ७९० करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. हा गेल्या ४५ दिवसांतला सर्वात कमी आकडा आहे. तर गेल्या २४ तासांत करोनामुळे ३६१७ जणांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात २ लाख ८४ हजार ६०१ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय. याचसोबत, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ७७ लाख २९ हजार २४७ वर पोहचलीय. देशात आत्तापर्यंत २ कोटी ५१ लाख ७८ हजार ०११ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. तर सध्या २२ लाख २८ हजार ७२४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर देशातील मृतांची एकूण संख्या ३ लाख २२ हजार ५१२ वर पोहचलीय.
  • एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : २ कोटी ७७ लाख २९ हजार २४७
  • एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : २ कोटी ५१ लाख ७८ हजार ०११
  • उपचार सुरू : २२ लाख २८ हजार ७२४
  • एकूण मृत्यू : ३ लाख २२ हजार ५१२
  • करोना लसीचे डोस दिले गेले : २० कोटी ८९ लाख ०२ हजार ४४५
देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान आतापर्यंत एकूण २० कोटी ८९ लाख ०२ हजार ४४५ लसीचे डोस देण्यात आले आहेत. यातील ३० लाख ६२ हजार ७४७ लसीचे डोस शुक्रवारी देण्यात आले. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (ICMR)दिलेल्या माहितीनुसार, २७ मे २०२१ पर्यंत देशात एकूण ३४ कोटी ११ लाख १९ हजार ९०९ नमुन्यांची चाचणी करण्यात आलीय. यातील २० लाख ८० हजार ०४८ नमुन्यांची करोना चाचणी कालच्या एकाच दिवसात करण्यात आली. मे महिन्यात दाखल झालेल्या करोनाबाधितांची संख्या ४ मे : ३,५७,२२९ ५ मे : ३,८२,३१५ ६ मे : ४,१२,२६२ ७ मे : ४,१४,११८ ८ मे : ४,०१,०७८ ९ मे : ४,०३,७३८ १० मे : ३,६६,१६१ ११ मे : ३,४८,४२१ १२ मे : ३,६२,७२७ १३ मे : ३,४३,१४४ १४ मे : ३,२६,०९८ १५ मे : ३,११,१७० १६ मे : २,८१,३८६ १७ मे : २,६३,५३३ १८ मे : २,६७,३३४ १९ मे : २,७६,०७० २० मे : २,५९,५९१ २१ मे : २,५७,२९९ २२ मे : २,४०,८४२ २३ मे : २,२२,३१५ २४ मे : १,९६,४२७ २५ मे : २,०८,९२१ २६ मे : २,११,२९८ २७ मे : १,८६,३६४ २८ मे : १,७३,७९० मे महिन्यातील मृत्यूसंख्या ४ मे : ३४४९ ५ मे : ३७८० ६ मे : ३९८० ७ मे : ३९१५ ८ मे : ४१८७ ९ मे : ४०९२ १० मे : ३७५४ ११ मे : ४२०५ १२ मे : ४१२० १३ मे : ४००० १४ मे : ३८९० १५ मे : ४०७७ १६ मे : ४१०९ १७ मे : ४३१९ १८ मे : ४५२९ १९ मे : ३८७४ २० मे : ४२०९ २१ मे : ४१९४ २२ मे : ३७४१ २३ मे : ४४५४ २४ मे : ३५११ २५ मे : ४१५७ २६ मे : ३८४७ २७ मे : ३६६० २८ मे : ३६१७


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3p0BeAO

No comments:

Post a Comment