नवी दिल्ली : भारतात सुरु असलेल्या कोविडविरुद्ध लसीकरण मोहिमेदरम्यान लसीची कमतरता हा चिंतेचा विषय ठरतोय. याच दरम्यान, शनिवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात शुक्रवारी (२१ मे २०२१) २ लाख ५७ हजार २९९ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचसोबत, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ६२ लाख ८९ हजार २९० वर पोहचलीय. देशात सध्या २९ लाख २३ हजार ४०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एका दिवसात ४१९४ जणांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. आतापर्यंत देशात एकूण २ लाख ९५ हजार ५२५ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. तर याच २४ तासांत तब्बल ३ लाख ५७ हजार ६३० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशात आत्तापर्यंत २ कोटी ३० लाख ७० हजार ३६५ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत.
- एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : २ कोटी ६२ लाख ८९ हजार २९०
- एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : २ कोटी ३० लाख ७० हजार ३६५
- उपचार सुरू : २९ लाख २३ हजार ४००
- एकूण मृत्यू : २ लाख ९५ हजार ५२५
- करोना लसीचे डोस दिले गेले : १९ कोटी ३३ लाख ७२ हजार ८१९
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2RvGQag
No comments:
Post a Comment