Breaking

Thursday, May 20, 2021

हवाईदलाच्या आणखी एका 'मिग २१' ला अपघात, पायलटचा जागीच मृत्यू https://ift.tt/342eAyr

नवी दिल्ली : गुरुवारी रात्री उशिरा भारतीय हवाई दलाच्या '' या लढाऊ विमानाचा पंजाबमधील मोगाजवळ अपघात झाला. या अपघातात पायलटचा मृत्यू झाला आहे. नियमित प्रशिक्षणा दरम्यान ' बायसन' या विमानानं राजस्थानच्या सूरतगढहून हवेत उड्डाण घेतलं होतं, अशी माहिती भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलीय. मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमध्ये मोगाच्या कस्बा बाघापुराना गावाच्या लंगियाना खुर्दजवळ रात्री १.०० वाजल्यादरम्यान हे विमान कोसळलं. अपघातानंतर विमानानं पेट घेतला. पश्चिम क्षेत्रात कोसळल्यानंतर या विमानाचा पालयट स्क्वॉड्रन लीडर अभिनव चौधरी गंभीररित्या जखमी झाले होते. शुक्रवारी सकाळी पायलट अभिनव यांचा मृतदेह हाती घेण्यात आला आहे. हवाईदलाकडून या दु:खद घटनेवर शोक व्यक्त करण्यात आला आहे. मिग २१ विमानाचा हा अपघात नेमका कसा घडला? त्याची माहिती मिळवण्यासाठी या घटनेच्या 'कोर्ट ऑफ इन्क्वायरी'चे आदेश देण्यात आले आहेत. 'मिग २१' विमानाचे अपघात यापूर्वीही १७ मार्च २०२१ रोजी एका मिग २१ चा अपघात झाला होता. या अपघातात ग्रुप कॅप्टन ए गुप्ता यांचा मृत्यू झाला होता. त्यापूर्वी ५ जानेवारी रोजी राजस्थानच्या एअरबेसवर एका मिग २१ बायसन विमानाला अपघात झाला होता. या विमानानं सूरतगढ एअरबेसवरून उड्डाण घेतलं होतं. त्यानंतर काही वेळातच हे विमान खाली कोसळलं. परंतु, या अपघातात पायलट सुरक्षित बाहेर पडण्यात यशस्वी झाला होता. भारतानं १९६१ साली रशियाच्या 'मिकोयान-गुरेविच डिझाईन ब्युरो' निर्मित मिग २१ विमानांची खरेदी केली होती. भारतीय वायुदलाकडून अजूनही या विमानांचा वापर केला जात आहे. भारतीय हवाई दलात मिग २१ चे अजूनही चार स्क्वॉड्रन आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2SezS9z

No comments:

Post a Comment