Breaking

Wednesday, May 26, 2021

करोनामुळे दगावलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी? https://ift.tt/34nzt7i

म. टा. प्रतिनिधी, मुंबई राज्य परिवहन (एसटी) महामंडळातील करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या २५० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय आर्थिक मदत आणि नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. कडक निर्बंधांच्या काळात काम मिळणेही अवघड झाल्याने पोटापाण्याची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, आता महामंडळाच्या वर्धापन दिनाच्या मुहूर्तावर अर्थात एक जून रोजी या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याचे संकेत आहेत. करोनामुळे मृत्यू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची विभागनिहाय माहिती मागवण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांच्या वारसांना महामंडळात नोकरी देण्यासाठी प्राथमिक चर्चा झाली आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल. एसटी सेवा सुरू करण्यासाठी महामंडळालादेखील कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. महामंडळात एकूण ८,२०० कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली. यापैकी २६१ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, तर ७,२१५ कर्मचारी बरे झाले असून, ७२३ कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. करोना काळात आपल्या प्राणाची पर्वा न करता मुंबईत बेस्ट मार्गावर राज्यातील हजारो चालक-वाहकांनी सेवा दिली. करोनाने मृत्यूमुखी पडणाऱ्यांमध्ये चालक-वाहकांची संख्या अधिक आहे. मुंबईत राहण्यापासून जेवणापर्यंत सर्वच गोष्टींची आबाळ असताना एसटी कर्मचाऱ्यांनी कर्तव्य पार पाडले. या कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी अद्याप धोरण जाहीर केलेले नाही. पन्नास लाखांच्या घोषणेचा फार्स करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये देण्याची घोषणा परिवहनमंत्री यांनी केली होती. मात्र, ही मदत नियमांच्या जाळ्यात अडकवून केवळ ११ जणांनाच पात्र ठरवण्यात आल्याची माहिती आहे. या मुद्द्यावर महामंडळातील २१ कामगार संघटनाही आपल्या सोईची भूमिका घेत आहेत. यामुळे ५० लाखांच्या मदतीचा फार्सच असल्याचे दिसून येत आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3wBSwad

No comments:

Post a Comment