Breaking

Thursday, May 27, 2021

लसीकरण झालेल्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्याची मागणी https://ift.tt/34rwsmt

म. टा. प्रतिनिधी मुंबई : वयाची ४५ वर्षे आणि लसीकरण पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना मुंबई लोकलमधून प्रवासाची परवानगी द्यावी, प्रवास अडचणीतून किमान या वर्गाची तरी सुटका होईल, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे. ( Travelling) लॉकडाऊनमधील निर्बंधांमुळे नोकरदार वर्ग आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडला आहे. मुंबई, , कल्याण, नवी मुंबई सर्वच भागात करोना बाधितांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. मुंबईतील करोना दुपटीचा कालावधी ११ महिन्यांपर्यंत पोहोचला आहे. लॉकडाउनच्या नावाखाली कमावत्या माणसांना आता अधिक काळ घरात डांबून ठेवणे योग्य नाही, असे आमचे मत आहे. लाखो कुटुंबांच्या आर्थिक स्थैर्याचा शासनाने गंभीरपणे विचार करायला हवा. मुख्यमंत्र्यानी आवाहन करूनही अपवाद वगळता बहुसंख्य खासगी आस्थापना आपल्या कर्मचाऱ्यांना या काळात पगार देत नाहीत. ही स्थिती लक्षात घेता १ जूनपासून दोन्ही डोस घेतलेल्या सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करणे योग्य ठरेल. यामुळे सर्वसामान्यांचे प्रवास यातनेतून सुटका होईल. वाचा: 'राज्याचे अर्थचक्र सुरळीत ठेवण्यासाठी कारखाने सुरू आहेत; मात्र कामावर जाण्यासाठी लोकल प्रवासाला परवानगी नाही, हा मोठाच विरोधाभास आहे. यामुळे अशा प्रवाशांना लोकल मुभा द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे', असे रेल्वे सल्लागार समितीचे माजी सदस्य मनोहर शेलार, रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख आणि सर्वच रेल्वे प्रवासी संघटनांनी केली आहे. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3hW2xL9

No comments:

Post a Comment