Breaking

Friday, May 28, 2021

राज्यातील 'या' २१ जिल्ह्यांत निर्बंध कायम; राजेश टोपेंचे संकेत https://ift.tt/34u4fM6

म. टा. प्रतिनिधी, पुणे करोनाचा 'पॉझिटिव्हिटी रेट' अधिक असलेल्या २१ जिल्ह्यांमध्ये आणखी १५ दिवसांपर्यंत वाढविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. हा दर नियंत्रित असलेल्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल केले जाण्याची शक्यता असून, याबाबत मुख्यमंत्री ३१ मेपर्यंत निर्णय घेतील,' अशी माहिती आरोग्यमंत्री यांनी शुक्रवारी दिली. पुण्यातील साखर संकुल येथे एका बैठकीसाठी आलेल्या टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'आरोग्य विभागाच्या सादरीकरणात राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये करोनाचा 'पॉझिटिव्हिटी रेट' दहा टक्क्यांच्या वर आहे. अशा ठिकाणी खाटांची उपलब्धता, ऑक्सिजन पुरवठा आदी प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पॉझिटिव्हिटी दर जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये १५ दिवसांपर्यंत लॉकडाउन वाढवावा, असा निर्णय घेण्यात आला आहे. पॉझिटिव्हिटी दर कमी असलेल्या जिल्ह्यांत निर्बंधांना शिथिलता देण्याची निश्चित शक्यता आहे. त्यामध्ये दुकानांच्या वेळा वाढविण्याबाबत विचार केला जाईल. रेस्टॉरंट, लग्नसमारंभ, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांवरील निर्बंध पुढील पंधरा दिवस कायम राहणार आहेत,'असेही त्यांनी नमूद केले. लशी घेण्यासाठी निधीची कोणतीही अडचण नसून, रोज आठ ते दहा लाख नागरिकांचे लसीकरण करण्याची आरोग्य विभागाची क्षमता आहे. त्यासाठी फक्त केंद्राने आम्हाला लस उपलब्ध करून दिली पाहिजे. राजेश टोपे, आरोग्यमंत्री


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3fRZYr5

No comments:

Post a Comment