Breaking

Saturday, May 8, 2021

मुंबईत लसीकरण केंद्रांचा झाला राजकीय आखाडा https://ift.tt/3f84UYa

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई महापालिकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी '' लसीकरण केंद्र सुरू करून दिलासा दिला असला, तरी ही केंद्रे आता राजकीय आखाडा बनू लागली आहेत. चारच दिवसांपूर्वी भांडुप येथील केंद्रावरून आणि भाजपमध्ये झालेल्या वादानंतर शनिवारी दुपारी अंधेरी स्पोर्टस् कॉम्प्लेक्समध्ये दोन्ही पक्षांमध्ये जोरदार राडा झाला. दोन्ही गटांनी एकमेकांना धक्काबुक्की, शिवीगाळ करून आपला राजकीय अजेंडा राबवला. त्यानंतर दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या. या राड्यानंतर तासभराने लसीकरण सुरू झाले. पालिकेने मुंबईत सात ठिकाणी 'ड्राइव्ह इन' लसीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील अंधेरी स्पोर्टस् कॉम्प्लेक्समधील केंद्राचा शनिवारी सकाळी ११ वाजता शुभारंभ होणार होता. उद्घाटनाआधी तेथे भाजपच्या आमदार भारती लव्हेकर आपल्या कार्यकर्त्यांसह उपस्थित होत्या. थोड्याच वेळात पालिकेच्या आरोग्य समितीच्या अध्यक्ष राजुल पटेल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह हजर झाल्या. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते हजर असूनही लसीकरण सुरू होत नसल्याने नागरिक आणि त्यांच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली. त्यावर पटेल यांनी आधी लसीकरण सुरू करा, खूप उशीर होत असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर भाजपचे कार्यकर्तेही पुढे सरसावले. कुणाच्या सांगण्यावरून लसीकरण सुरू होते, असा दावा करत दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू झाला. राजुल पटेल आणि भारती लव्हेकर यांच्यामध्ये शाब्दिक चकमकीनंतर बाचाबाची झाली. त्यानंतर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये रेटारेटी आणि धक्काबुक्की झाली. राजूल पटेल आणि शिवसैनिक हारुन खान यांनी आमच्या कार्यकर्त्यांशी धक्काबुक्की केल्याचा आरोप लव्हेकर यांनी केला असून, योगीराज दाभाडकर व अन्य कार्यकर्त्यांनी सेनेच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याचे पटेल यांनी सांगितले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3bdjoF6

No comments:

Post a Comment