Breaking

Thursday, May 20, 2021

इस्रायलकडून शस्त्रसंधीला मंजुरी; ११ दिवसानंतर गाझा पट्टीत संघर्ष थांबला https://ift.tt/3fAdzmD

तेल अवीव/गाझा: इस्रायल आणि दरम्यान मागील ११ दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष अखेर थांबला आहे. गुरुवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या संरक्षण विषयक मंत्रिमंडळाने गाझा पट्टीत शस्त्रसंधीला मंजुरी दिली आहे. हमासच्या अधिकाऱ्याने याची पुष्टी केली आहे. शस्त्रसंधी शुक्रवारपासून अंमलात येणार आहे. गाझा पट्टीवरील हल्ले थांबवण्यासाठी इस्रायलवर मोठ्या प्रमाणावर जागतिक दबाब होता. अमेरिकेनेदेखील इस्रायलला शांततेचे आवाहन केले होते. मात्र, इस्रायलने त्याकडे दुर्लक्ष करत निर्णायक संघर्ष सुरू झाला असल्याचे म्हटले होते. गुरुवारी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या उच्च स्तरीय संरक्षण कॅबिनेट मंत्र्यांनी शस्त्रसंधी लागू करण्यासाठी पाठिंबा दिला. वाचा: इस्रायलसोबत शस्त्रसंधीबाबत हमासनेही दुजोरा दिला आहे. 'रायटर्स'ला हमासच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की हमास आणि इस्रायलमध्ये शस्त्रसंधी लागू झाली आहे. त्याशिवाय गाझामध्ये सुरू असलेला ११ दिवसांचा संघर्ष थांबला आहे. वाचा: २२७ पॅलेस्टिनी ठार गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या वृत्तानुसार, आतापर्यंत ६४ बालके आणि ३८ महिलांसह कमीत कमी २२७ पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले आहेत. तर, १६२० जण जखमी झाले आहेत. हमास आणि इस्लामिक जिहाद या गटांनी आपले २० जण ठार झाले असल्याचे म्हटले आहे. तर, इस्रायलच्या दाव्यनुसार ही संख्या १३० आहे. दोन्ही बाजूने सुरू असलेल्या संघर्षामुळे ५८ हजार पॅलेस्टिनी नागरिकांना स्थलांतर करावे लागले आहे. वाचा: हमासच्या हल्ल्यात इस्रायलमध्ये पाच वर्षाचा एक बालक, १६ वर्षीय मुलगी आणि एका जवानासह १२ जण ठार झाले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, इस्रायलच्या हल्ल्यात कमीत कमी १८ रुग्णालये आणि दवाखाने नष्ट झाले आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3oMzeMN

No comments:

Post a Comment