Breaking

Monday, May 24, 2021

मुंबईकरांत अजूनही मास्क बेफिकिरी; पालिकेने वसूल केला 'इतका' कोटी दंड https://ift.tt/3fCzrxK

‌म. टा. विशेष प्रतिनिधी, करोनाला रोखण्यासाठी मुंबईत लॉकडाउनसारखे उपाय योजले जात असतानाही अनेक मुंबईकर मास्क वापरण्याबाबत बेफिकीर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे फिरणाऱ्यांवरील कारवाईदेखील तीव्रतेने राबविली जात आहे. त्यातून, गेल्या वर्षी २२ मार्चपासून ते आतापर्यंत २७ लाख ५८ हजार ६४९ जणांवर कारवाई झाली आहे. त्यातून तब्बल ५५ कोटी ५६ लाखांवर दंड वसूल केला आहे. मुंबई पालिकेने सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. तसेच, त्याचे पालन न करणाऱ्यांविरोधात गतवर्षी २२ मार्चपासून कारवाई हाती घेतली आहे. पालिकेसह मुंबई पोलिस, रेल्वे मार्गांवरदेखील ही कारवाई हाती घेण्यात येत आहे. पालिकेकडून क्लीन अप मार्शलच्या माध्यमातून दंड वसूल केला जात आहे. त्यात, सुरुवातीस एक हजार रु. इतका दंड वसूल केला जात होता. पण नंतर दंडाची रक्कम कमी करून २०० रु. एवढी करण्यात आली. आतापर्यंतची कारवाई महापालिका - पालिकेने आतापर्यंत मास्क न वापरणाऱ्या २३ लाख ९६ हजार २४९ जणांवर कारवाई केली आहे. त्यातून ४८ कोटी २८ लाख ८० हजार ८०० रु. दंड वसूल केला आहे. पोलिस - मुंबई पोलिसांच्या कारवाईत ३ लाख ३८ हजार ५०९ जणांवर कारवाई ६ कोटी ७० लाख रु. दंड वसूल केला आहे. रेल्वे - पश्चिम, मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर २३,८९१ जणांवर कारवाई करून ५० लाखांवर दंड वसूल केला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3fjpiY0

No comments:

Post a Comment