Breaking

Saturday, May 22, 2021

'देशाचे नेतृत्व करोनाऐवजी निवडणुकीत गुंतले'; संजय राऊत यांचे मोदींवर प्रहार https://ift.tt/3fTUOef

मुंबई: शिवसेनेचे खासदार यांनी आणि भाजपच्या राष्ट्रवादावर ताशेरे ओढत हल्लाबोल केला आहे. संपूर्ण जग करोनाशी लढण्यासाठी रणनीती ठरवण्यात गुंतले असताना आमच्या देशाचे नेतृत्व निवडणूक जिंकण्याची रणनीती ठरवण्यात गुंतून पडले. अमेरिका 'मास्कमुक्त' झाला. इस्त्रायल करोनामुक्त झाला. युरोपातील अनेक राष्ट्रे सावरली. चीनने करोनावर विजय मिळवला व मोठी आर्थिक झेप घेतली. आम्ही काळात निवडणुका आणि सीबीआय, ईडीचा खेळ खेळत बसलो, अशा शब्दात राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केले आहे. (shiv sena mp criticizes over situation in country) शिवसेनेच्या 'सामना' या मुखपत्रातील रोखठोक या सदरात राऊत यांनी पंतप्रधान मोदी, साध्वी प्रज्ञा आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. देशाचे नेतृत्व राजकारणात गुंतल्यानेच गंगेत प्रेते वाहताना आम्ही पाहिल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे. आता करोनाची तिसरी लाट येत आहे. लाटांवर लाटा येतच जातील व प्रत्येक लाटेने देश कोलमडून जाईल अशी शक्यता व्यक्त करताना या सगळ्यांतून बाहेर पडण्याचा मार्ग आमच्या राज्यकर्त्यांकडे नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. गंगा बी पापाच्या शुद्धीकरमासाठी होती. आज गंगेचा प्रवाह पाप लपवायला आणि धुवायला तयार नाही. राजकारणाच्या गुडघ्यातून मान बाहेर काढून या प्रश्नांकडे जे पाहतील त्यांनाच सभोवतालचे सत्य दिलेस असा टोलाही त्यांनी लगावला आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावरही साधला निशाणा राऊत आपल्या लेखात म्हणतात, 'करोनाचे संकट कायम असताना महाराष्ट्रावर चक्रीवादळाने हल्ला केला. अशा वेळी राजकारण थोडे बाजूला ठेवून देशासाठी व राज्यासाठी काम करणे गरजेचे आहे. पण पश्चिम बंगालपासून महाराष्ट्रापर्यंत या संकटकाळातही राजकारण सुरूच आहे. महाराष्ट्रातील भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी याही परिस्थितीत सांगितले की, आज निवडणुका घेतल्या तरी भाजपला ४०० जागा मिळतील. यावर निखिल वागळे यांनी त्यांना चांगलेच उत्तर दिले आहे. आधी गंगेतून वाहून आणलेले मृतदेह उचला, मग निवडणुकांचं बघू. लोकांचे जगण्याचे आणि मरण्याचेही वांधे झाले आहेत आणि हे महाशय म्हणतात, चारशे जागा जिंकू. (कोठून आणतात हे इतका आत्मविश्वास?)' देशात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. पण फाजिल आत्मविश्वासाचे फुगे उंच हवेत उडत आहेत.' क्लिक करा आणि वाचा- 'गंगेत तरंगणाऱ्या शेकडो प्रेतांची देशाचा भेसूर चेहरा जगासमोर आणला' भाजपच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांना करोना झाला नाही. त्याचे श्रेय त्या नियमित गोमूत्र प्राशनाला देतात. गंगेतत तरंगणाऱ्या शेकडो प्रेतांना ऑक्सिजन, लस मिळाली नाही. निदान त्यांना गोमूत्र तरी मिळायला हवे होते. करोना असो की चक्रीवादळ प्रत्येक संकटाचे राजकारण सुरूच आहे असे सांगतानाच, म्हणून गंगेत फेकलेली प्रेते जिवंत होतील काय?, असा सवालही राऊत यांनी विचारला आहे. क्लिक करा आणि वाचा- देशातील गोमूत्र प्रशानावर रशियासह अनेक देशांतील वृत्तपत्रांनी आपली चेष्टा केली आहे. गंगेज जे हजारो करोनाग्रस्त मृतदेह सोडून दिले व त्यांच्यावर धड अंत्यसंस्कारही होऊ शकले नाहीत, त्यांच्यापर्यंत गोमूत्र संदेश गेला असता तर त्यांना गंगेत फेकून देण्याची वेळ आली नसती. गंगेत तरंगणाऱ्या शेकडो प्रेतांची देशाचा भेसूर चेहरा जगासमोर आणल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2QJlsxN

No comments:

Post a Comment