Breaking

Friday, May 28, 2021

दिलासादायक! राज्यातील 'या' जिल्ह्यांत करोना रुग्णांची संख्या उतरणीला https://ift.tt/3g92xVV

मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर आता हळूहळू ओसरत आहे. संसर्गाचा जोर अधिक होता, अशा जिल्ह्यांतील उपचाराधीन रुग्णांची संख्या आता उतरणीला लागल्याचे दिलासादायक चित्र आहे. राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण राज्याच्या सरासरी प्रमाणापेक्षाही कमी असल्याचे दिसत आहे. पहिल्या लाटेशी तुलना करता राज्यामध्ये मुंबई, , रायगड, पुणे, नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे, औरंगाबाद, लातूर, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर येथे उपचाराधीन रुग्णसंख्येचे प्रमाण कमी झाल्याचे दिसते. तर पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, जालना, बीड, हिंगोली, उस्मानाबाद, अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली येथे हे प्रमाण वाढले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2SHpG9S

No comments:

Post a Comment