म. टा. वृत्तसेवा, राज्य सरकारकडून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद करण्यात आले असले, तरी ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाझा करोना रुग्णालयात एका अभिनेत्रीला लस देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. () असे या अभिनेत्रीचे नाव असून तिने समाजमाध्यमांवरून लसीकरणाची छायाचित्रे टाकून माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघड झाला होता. ३६ वर्षांच्या मीरा चोप्राने सुपरवायझर असल्याचे ओळखपत्र दाखवून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणावर डल्ला मारला. विशेष म्हणजे, ठाणे महापालिकेस मनुष्यबळ पुरवणाऱ्या कंत्राटदार कंपनीनेच या अभिनेत्रीला ओळखपत्र दिल्याचे समोर आल्यानंतर या कंपनीचे कार्यपद्धतीही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ठाण्यासह राज्यात लसीकरणाचा तुटवडा असल्यामुळे १ मे पासून सुरू केलेले १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सरकारने थांबविले. कोविन अॅपमध्येही या वयोगटासाठी लसीकरणाचे बुकिंग केले जात नाही. मात्र शुक्रवारी अभिनेत्री मीरा चोप्रा यांनी लसीकरण केल्याचे सोशल मीडिया अकाउंटवरून जाहीर केले. त्यांचे वय कमी असतानाही लस कशी मिळाली, अशा शंका विचारण्यास सुरुवात झाली होती. तर एका व्यक्तीने संबंधित अभिनेत्रीने पार्किंग प्लाझा रुग्णालयात कर्मचारी असल्याचे ओळखपत्र सादर केल्याचे स्पष्ट करत त्या ओळखपत्राचा फोटो टाकला. त्यामुळे या अभिनेत्रीच्या लसीकरणाची चर्चा ठाणे शहरात सुरू झाली. वाचा: अनेक ज्येष्ठ नागरिकांना लशीसाठी मोठमोठ्या रांगांमध्ये उभे राहावे लागत आहे. त्यानंतरही लस संपल्याने घरी जावे लागत आहे. असे असताना या अभिनेत्रीला लसीकरणासाठी पायघड्या अंथरल्याने शहरात संताप व्यक्त होत आहे. महापालिका आणि सत्ताधारी ठाणेकरांशी दुजाभाव करत असल्याची भूमिका भाजपने व्यक्त केली आहे. टीकेनंतर ट्वीट डिलीट लसीकरणावरून वाद निर्माण झाल्यानंतर अभिनेत्री मीरा चोप्रा यांनी सोशल मीडियावरील ट्वीट डिलीट केले, तर एका व्यक्तीने लसीकरणावरून विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना कोविन अॅपमध्ये लसीकरणाचे बुकिंग केल्यास महाराष्ट्रात लसीकरण होऊ शकते, असे स्पष्टीकरण केले आहे. ठाणे महापालिका याबाबत माहिती घेऊन कारवाई करणार असल्याचे उपायुक्त संदीप माळवी यांनी सांगितले. कंत्राटदार कंपनी संशयाच्या भोवऱ्यात ठाणे महापालिकेच्या करोना रुग्णालयास मनुष्यबळ पुरवणाऱ्या कंत्राटदार कंपनीच्या नावाने अभिनेत्रीला 'सुपरवायझर' या आरोग्यसेवक पदाचे ओळखपत्र देण्यात आले होते. विशेष म्हणजे, त्यावर कर्मचारी संकेतांक 'पीपी ४२०' असा लिहिला होता. म्हणजेच, हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे ओळखपत्रातही अधोरेखित होत होते. या पार्श्वभूमीवर या कंत्राटदार संस्थेकडून अन्य व्यक्तींनाही बनावट ओळखपत्रे देऊन लसीकरण केले जात असल्याची शंका उपस्थित होत आहे. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3i2Dsyd
No comments:
Post a Comment