Breaking

Friday, May 21, 2021

मान्सून अंदमानात दाखल, चक्रीवादळाचाही हवामान विभागाचा अंदाज https://ift.tt/3oILiOP

म. टा. विशेष प्रतिनिधी, साऱ्या देशात आनंद घेऊन येणाऱ्या मान्सूनची शुभवार्ता आली असून नैऋत्य मौसमी वारे शुक्रवारी अंदमानात दाखल झाले आहेत. येत्या ४८ तासांमध्ये मान्सूनचे वारे पूर्ण अंदमान-निकोबार व्यापतील, असा अंदाज भारतीय हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे. अंदमानात प्रवेश करताना बंगालच्या उपसागराचा नैऋत्य आणि आग्नेयेकडील काही भागही मान्सूनने व्यापला. गेल्यावर्षी १७ मे रोजी अंदमानात दाखल झाला होता. नैऋत्येकडून येणारे वारे अधिक प्रभावी झाले आहेत. तसेच निकोबार बेटांचा परिसर, अंदमानचा समुद्र या भागामध्ये सर्वदूर पाऊस आहे. मान्सून येत्या काही दिवसांत अधिक प्रभावीपणे पुढे प्रवास करेल. बंगालच्या उपसागराचा नैऋत्य भाग, बंगालच्या उपसागराचा उर्वरित आग्नेय भाग, अंदमानचा संपूर्ण समुद्र, अंदमान-निकोबार बेटांचा संपूर्ण प्रदेश, बंगालच्या उपसागराचा मध्य भाग येथे मान्सून पुढे सरकेल. २१ ते २३ मे या दरम्यान अंदमान-निकोबार बेटांच्या बहुतांश परिसरात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे तर तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. पुन्हा चक्रीवादळाची धास्ती पूर्व-मध्य बंगालचा उपसागर आणि शेजारील उत्तर अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन त्याचे येत्या सोमवारी चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. त्याचा प्रवास वायव्य दिशेने होईल. त्यानंतर हे चक्रीवादळ ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यापर्यंत २६ मेच्या सकाळपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. राज्यात पाऊस राज्यात रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या किनारपट्टी भागात शनिवारपासून मेघगर्जनेसह हलक्या पावसाला सुरुवात होईल. मंगळवारी याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर येथे सोमवारी आणि मंगळवारी मेघगर्जनेसह विजा आणि पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईमध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2TbUIqw

No comments:

Post a Comment