Breaking

Monday, May 24, 2021

करोना संकटाचा मुंबई विमानतळाला फटका; झाले कोटींचे नुकसान https://ift.tt/3oKMZLI

म. टा. प्रतिनिधी विलेपार्ले : करोना संकटामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला किमान १५ कोटी रुपयांचा फटका बसला. प्रवासीसंख्येत घट झाल्याने विमानतळ विकास शुल्कात तूट निर्माण झाली आहे. करोना संकटाआधी मुंबईचे हे विमानतळ देशात सर्वाधिक व्यग्र होते. विमानतळावरून वार्षिक सरासरी ४ कोटी ३३ लाख प्रवाशांची ये-जा सुरू होती. पण मागील वर्षी २५ मार्च ते २५ मे असे दोन महिने विमानतळ पूर्णपणे ठप्प राहिले. त्यादरम्यान ७० लाखांनी प्रवासीसंख्या कमी झाली. त्यानंतर विमानतळ सुरू झाले असले तरी दररोजच्या उड्डाणांची संख्या निम्म्याहून कमी आहे. उड्डाणसंख्या घटल्यानेच प्रवासीसंख्येतही घट झाली आहे. २५ मे रोजी विमानतळ सुरू झाल्यानंतर आतापर्यंत ही घट किमान दीड कोटीच्या घरात आहे. त्यामुळे शुल्क वसुलीत घट झाली आहे. मुंबईच्या विमानतळावरून रवाना होताना प्रत्येक तिकिटामागे विकास शुल्क आकारले जाते. सध्या देशांतर्गत प्रवासासाठी हे शुल्क १२० रुपये तर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ७२० रुपये आहे. या रकमेतून आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडद्वारे (मिआल) विमानतळावरील विकासकामे केली जातात. या दोन्ही दरांचा सरासरी विचार केल्यास दीड कोटी प्रवासीसंख्या कमी झाल्याने विमानतळाला बसलेला आर्थिक फटका किमान १५ कोटी रुपयांच्या घरात आहे. याच पार्श्वभूमीवर विकास शुल्क वाढविण्यास मंजुरी देण्याची मागणी विमानतळ प्रशासनाने विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणाकडे (एईआरए) केली होती. पण करोना संकटामुळे सध्याचे दर ३१ मार्च, २०२२ पर्यंत कायम असतील, असे 'एईआरए'ने म्हटले आहे. दरम्यान, सन २०१२मध्ये हे दर निश्चित झाले, त्यावेळी विमानतळाची महसुली तूट ३८४५ कोटी रुपये होती. सन २०१६मध्ये दर वाढविले, त्यावेळी ही तूट ५१८ कोटी रुपये होती. तर सध्या ५२४ कोटी रुपयांची तूट असल्याने हे दर वाढविण्याची मागणी होती.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3bRatJO

No comments:

Post a Comment