Breaking

Wednesday, May 26, 2021

पेट्रोल-डिझेल दरवाढ कायम; मुंबईत पेट्रोलने गाठली विक्रमी पातळी https://ift.tt/3p0UM8j

मुंबई : एक दिवसआड करून होणाऱ्या इंधन दरवाढीने देशात महागाईचा आगडोंब उसळण्याची शक्यता आहे. आज गुरुवारी पुन्हा एकदा पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलची भाव वाढ केली आहे. आज पेट्रोल २४ पैसे आणि डिझेल २९ पैशांनी महागले आहे. या दरवाढीने विक्रमी ९९.९४ रुपये इतका झाला आहे. पेट्रोलने शंभरी गाठण्यासाठी अवघे ६ पैसे कमी आहेत. इंधन दरवाढीवरून सरकारवर टीका केली जात आहे. आज गुरुवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९९.९४ रुपयांवर झाला आहे. यापूर्वीच मुंबईत प्रीमियम पेट्रोल शंभर रुपयांवर गेले आहे. आता साधे पेट्रोल १०० रुपये होण्यासाठी ६ पैशांची तफावत आहे. उद्या किंवा परवामध्ये पेट्रोल १०० रुपयांचा टप्पा ओलांडेल, अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. आज दिल्लीत पेट्रोल ९३.६८ रुपये आहे. चेन्नईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९५.२८ रुपये आहे. तर कोलकात्यात पेट्रोलचा भाव ९३.७२ रुपये झाला आहे. मुंबईत आजचा एक लीटर डिझेलचा भाव ९१.८७ रुपये आहे. दिल्लीत डिझेलचा भाव ८४.६१ रुपये आहे. चेन्नईत डिझेल ८९.३९ रुपये प्रती लीटर आहे. कोलकात्यात डिझेल ८७.४६ रुपये प्रती लीटर झाले आहे. दरम्यान, जागतिक कमॉडिटी बाजारात क्रूडचा भाव ७० डॉलरच्या नजीक पोहोचला आहे. इंधन मागणी वाढल्याने सध्या तेलाची बाजारपेठ तेजीत असल्याचे कमॉडिटी विश्लेषकांचे म्हणणे आहे. अमेरिकन पेट्रोलियम इन्स्टिट्युटच्या आकडेवारीनुसार २१ मे रोजी संपलेल्या आठवड्यात अमेरिकेत तेलाचा साठा ४.३९ दशलक्ष बॅरल आहे. त्यामुळे संपूर्ण आठवडा इंधनाला मागणी राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, बुधवारी ब्रेंट क्रूडचा भाव ०.०८ डॉलरने वधारला आणि ६८.७३ डॉलर प्रती बॅरल झाला. तर डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ०.०५ डॉलरच्या तेजीसह ६६.०६ डॉलर प्रती बॅरल झाला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3wPelmX

No comments:

Post a Comment