Breaking

Saturday, May 29, 2021

अभिनेते भूषण कडू यांच्या पत्नीचं करोनामुळं निधन https://ift.tt/3p3N51c

मुंबई: प्रसिद्ध मराठी अभिनेते () यांची पत्नी () यांचं करोनामुळं निधन झालं आहे. कादंबरी यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथंच उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ३९ वर्षांच्या होत्या. करोनाचं (Coronavirus) निदान झाल्यानंतर कादंबरी यांना सुरुवातीला ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, प्रकृती खालावल्यामुळं त्यांना केईएममध्ये हलवण्यात आलं. तिथं त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारांना यश आलं नाही. भूषण कडू यांना सात वर्षांचा मुलगा आहे. कादंबरीच्या निधनामुळं कडू कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वाचा: छोट्या पडद्यावरील 'कॉमेडी एक्प्रेस'मधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले भूषण कडू हे त्यांच्या विनोदाच्या अफलातून टायमिंगसाठी ओळखले जातात. भूषण कडू हे 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या पर्वातही सहभागी झाले होते. त्यातील फॅमिली स्पेशल भागाच्या निमित्तानं भूषण यांच्यासोबत पत्नी कादंबरी व मुलगा प्रकीर्त हे देखील बिग बॉसच्या घरात दिसले होते. कादंबरी यांच्या निधनाबद्दल मराठी मनोरंजनसृष्टीतील मान्यवर कलाकारांनी दु:ख व्यक्त केलं आहे. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3igxutZ

No comments:

Post a Comment