Breaking

Monday, May 31, 2021

कडक निर्बंधाचा विमान उद्योगाला फटका; तिकीटदर पुन्हा महागले https://ift.tt/3pc8uVV

म. टा. प्रतिनिधी, विमान तिकीटदरांत ४ महिन्यांत दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. मुंबईहून दिल्ली, कोलकाता, बंगळुरूसाठीच्या तिकीट दरांत ४०० रुपयांपर्यंत वाढ झाल्याने प्रवाशांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. करोना लॉकडाउनदरम्यान गेल्या वर्षी दोन महिने ठप्प होती. त्यानंतर २५ मे रोजी विमानसेवा सुरू झाली. त्यावेळी केंद्र सरकारने देशांतर्गत प्रवासासाठी तिकीटदरांवर मर्यादा आणल्या. ४० मिनिटांपर्यंतचा प्रवास व ४० ते ६० मिनिटांचा प्रवास असे टप्पे करण्यात आले. या अंतर्गत ४० मिनिटांच्या प्रवासासाठी २ हजार ते ६ हजार रुपये व ४० ते ६० मिनिटांच्या प्रवासासाठी २,५०० ते ७,५०० रुपये दर निश्चित करण्यात आला. मात्र या दरांमध्ये फेब्रुवारीत १० ते ३० टक्के वाढ करण्यात आली. त्यामध्ये ४० मिनिटांपर्यंतच्या प्रवासासाठी २,३०० ते ७,८०० तर ४० ते ६० मिनिटांपर्यंतच्या प्रवासासाठी २,९०० ते ९,८०० रुपये तिकीटदर निश्चित झाले. परंतु आता बुधवारपासून या दरांत आणखी वाढ झाली आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने काढलेल्या परिपत्रकात ही वाढ नमूद करण्यात आली आहे. त्यानुसार ४० मिनिटांपर्यंतच्या प्रवासासाठीचा किमान दर २,६०० रुपये व ४० ते ६० मिनिटांपर्यंतच्या प्रवासासाठीचा किमान तिकीटदर आता ३,३०० रुपये करण्यात आला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3wPwCAb

No comments:

Post a Comment