मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज सोमवारी पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा दणका दिला आहे. आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रत्येकी २९ पैशांची वाढ झाली. या दरवाढीने मुंबईत पेट्रोलचा भाव प्रती लीटर १००.४७ रुपये झाला आहे. तर डिझेलसाठी ९२.४५ रुपये मोजावे लागत आहेत. यापूर्वी कंपन्यांनी रविवारी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नाही. दोन्ही इंधन दर जैसे थे ठेवले होते. तर शनिवारी देशभरात पेट्रोल २८ पैसे आणि डिझेल २६ पैशांनी महागले होते. याआधी गुरुवारी मुंबईतील उपनगरांमध्ये एक लिटर पेट्रोलचा भाव पहिल्यांद १०० रुपयांवर गेला होता. पेट्रोलची शंभरी गाठणारे मुंबई हे देशातील पहिले मेट्रो शहर ठरले होते. आजच्या दरवाढीनंतर मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १००.४७ रुपये झाला आहे. आज दिल्लीत पेट्रोल ९४.२३ रुपये झाले आहे. चेन्नईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९५.७६ रुपये आहे. तर कोलकात्यात पेट्रोलचा भाव ९४.२५ रुपये झाला आहे. मुंबईत आजचा एक लीटर डिझेलचा भाव ९२.४५ रुपये आहे. दिल्लीत डिझेलचा भाव ८५.१५ रुपये आहे. चेन्नईत डिझेल ८९.९० रुपये प्रती लीटर आहे. कोलकात्यात डिझेल ८८ रुपये प्रती लीटर झाले आहे. भोपाळमध्ये पेट्रोल १०२.३४ रुपये असून डिझेल ९३.६५ रुपये झाले आहे. आज सोमवारी कच्च्या तेलात भाववाढ दिसून आली. गेल्या आठवड्यात ब्रेंट क्रूडचा भाव ४ टक्क्यांनी वधारला होता. तीच तेजी आज कायम आहे. ब्रेंट क्रूडचा भाव ७ सेंट्सने वधारला असून तो ६८.७९ डाॅलर प्रती बॅरल झाला. यूएस टेक्सासमध्ये क्रूडचा भाव १३ सेंट्सने वधारला आणि ६६.४५ डाॅलर प्रती बॅरल झाला. आज रशियासह ओपेक देशांच्या सदस्यांची बैठक होणार आहे. अनलॉकनंतर युरोपात इंधन मागणी वाढली आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी इंधन उत्पादनात वाढ करण्याचा निर्णय या बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3i5dEBy
No comments:
Post a Comment