माले: मालदीवचे माजी राष्ट्रपती आणि विद्यमान संसद अध्यक्ष मोहम्मद नशीद हे त्यांच्या घराजवळ गुरुवारी झालेल्या बॉम्ब स्फोटात जखमी झाले. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लवकरच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने (आयएस) या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम सोलिह यांनी या दहशतवादी हल्ल्याच्या तपासासाठी ऑस्ट्रेलियाची मदत घेणार असल्याचे जाहीर केले आहे. शनिवारी ऑस्ट्रेलियाच्या फेडरल पोलीस विभागाचे अधिकारी दाखल होणार असून तपास कार्यात मदत करणार आहेत. हा हल्ला नशीद यांच्यावर झाला नसून देशाची लोकशाही आणि अर्थव्यवस्थेवर झाला असल्याचे त्यांनी म्हटले. या हल्ल्यात नशीद किरकोळ जखमी झाले असल्याचे म्हटले जात आहे. वाचा: स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. मोहम्मद नशीद यांनी काही काळापूर्वी भारत दौऱ्यादरम्यान मालदीवमध्ये इस्लामिक स्टेटच्या वाढत्या प्रभावाबाबत चिंता व्यक्त केली होती. पोलिसांनी या हल्ल्याचा तपास सुरू केला आहे. वाचा: वाचा: मालदीवमधील ३० वर्षांच्या एकाधिकारशाहीनंतर लोकशाही मार्गाने निवडून आलेले नशीद हे पहिले राष्ट्रपती आहेत. वर्ष २००८ ते २०१२ दरम्यान ते मालदीवचे राष्ट्रपती होते. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि तुरुंगवासाची शिक्षा मिळाल्यानंतर त्यांना २०१८ पर्यंत निवडणूक लढवण्यास मनाई करण्यात आली होती. त्यांच्या पक्षाचे उमेदवार इब्राहिम सोलिह यांचा २०१८ च्या राष्ट्रपती निवडणुकीत विजय झाला होता. नशीद यांची २०१९ मध्ये संसदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3f3yE8y
No comments:
Post a Comment