Breaking

Friday, May 7, 2021

कंगना रणौत करोना पॉझिटिव्ह, घरी जाण्याची करत होती तयारी https://ift.tt/3tv9OUy

मुंबई : देशामध्ये करोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असून पेशंटची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. करोनाच्या या दुसऱ्या लाटेचा फटका बॉलिवूडलाही बसला असून अनेक कलाकारांना याची लागण झाली आहे. यामध्ये अभिनेत्री कंगना रणौतचाही आता समावेश झाला आहे. खुद्द कंगनानेच ही माहिती इन्स्टाग्रामवरून दिली आहे. कंगनाने इन्स्टाग्रामवर शनिवारी सकाळी पोस्ट करून ही माहिती दिली. तिने पोस्टमध्ये लिहिले की, ' दोन-तीन दिवसांपासून मला खूप दमल्यासारखे आणि अशक्तपणा जाणवत होता. तसेच माझे डोळेही जळजळत होते. हिमाचलमधील माझ्या घरी जायचे होते त्यामुळे कालच मी करोनाची चाचणी केली. आज या चाचणीचा रिपोर्ट आला असून त्यात करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. करोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर मी स्वतःला घरातच क्वारन्टाइन करून घेतले आहेत.' 'मला अजिबात कल्पना नाही की करोनाची लागण मला कशी झाली. आता मी त्याला नष्टच करणार आहे. लोकांना मी एकच आवाहन करते की कोणत्याही वाईट शक्तीला तुमच्यावर वरचढ होऊ देऊ नका. जर झालाच तर तुम्ही त्याला घाबरू नका कारण तो अधिक तुम्हाला घाबरवेल चला आपण सर्व मिळून कोविड- १९ चा नायनाट करू या. हा एक लहानसा फ्ल्यू आहे परंतु तो आता आपल्या सर्वांवर मानसिकरित्या दबाव टाकत आहे. त्याला घाबरू नका. हर हर महादेव ' असे सांगत करोनाशी लढा देण्यासाठी ती धैर्याने सामोरी जाणार असल्याचे तिने सांगितले आहे. कंगनाने ही पोस्ट शेअर केल्यानंतर तिच्या चाहत्यांनी तसेच सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी तिला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. तर काही युझर्सने तिच्यावर टीकाही केली आहे. एका युझर्सने लिहिले आहे की, ' आता तू घरात झाडे लाव. तुला ऑक्सिजनची कमतरता जाणवणार नाही... ' दरम्यान, हिंदी सिनेमासृष्टीतील अनेक कलाकारांना करोनाची लागण झाली होती. त्यातून अनेकजण बरेही झाले आहेत. तर काहींना आपला प्राण गमवावा लागला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3nZ5OKO

No comments:

Post a Comment