Breaking

Friday, May 7, 2021

व्हॉट्सअ‍ॅपवर असं काही लिहलं की अंत्यसंस्कार थांबला, सांगलीत माणुसकीला काळीमा फासणार प्रकार https://ift.tt/3uuJz1D

सांगली : राज्यात कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. रुग्णांची वाढती संख्या आणि मृतांची संख्या यामुळे नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे. अशात सोशल मीडियावर कोरोनाच्या अनेक अफवा आणि व्हायरल व्हीडिओ आपण पाहतोच. सांगलीत याचाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर एका व्यक्तिच्या मृत्यूबद्दल अशी काही माहिती पसरवली की अंत्यसंस्कारासाठी कुटुंबाला चक्क वणवण करावी लागणी. कोरोना ही जशी आरोग्य व्यवस्थेची परीक्षा आहे तशीच ती माणुसकीचीही परीक्षा आहे. पण सांगलीतल्या कवठेमहांकाळ इथं माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार घडला आहे. इथे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर तो कोरोनामुळे दगाला असल्याची अफवा सोशल मीडियावर केली आणि यामुळे मृताच्या अंत्यसंस्काराला कोणीही मदत करण्यासाठी पुढे आलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, रणजीत असं मृत्यू झालेल्या व्यक्तिचं नाव आहे. रणजीतचा मृत्यू झाल्यानंतर त्याची कोरोना चाचणी केली असता सगळे रिपोर्ट्स नेगिटिव्ह आले होते. पण काही टवाळक्यांनी त्याचा मृत्यू करोनामुळे झाला असल्याची माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर पसरवली. यामुळे कोणीही रणजीतच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी पुढे आलं नाही. कुटुंबाने मृतदेह स्मशानात घेऊन जाण्यासाठी अनेकांना मदतीची हाक दिली पण कोणीही पुढे न आल्यामुळे अखेर रणजीतचा मृतदेह बैलगाडीत घेऊन जाण्याची वेळ आली. मृत्यूनंतरही अशा प्रकारे हाल झाल्यामुळे कुटुंबाला मोठा माणसिक त्रास सहन करावा लागला. पोलिसांकडून कारवाईची मागणी दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर रणजीतच्या कुटुंबाने पोलिसांत धाव घेतली आणि घडलेला प्रकार सांगितला. यानंतर पोलिसांनी तातडीने अफवा पसरवणाऱ्याला शोधून कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2REIWE4

No comments:

Post a Comment