नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकी घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार मेहुल चोक्सी सध्या डॉमिनिका देशाच्या तुरुंगात असून त्याचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. चोक्सीच्या डोळ्याला इजा झाली असून हातावर जखमा झालेल्या आहेत. भारतातून पळून गेल्यानंतर तीन वर्षांनंतर पहिल्यांदाच मेहुल चोक्सीची छबी कॅमऱ्याने टिपली आहे. अपहरण आणि मारहाणीचा दावा केलेला चोक्सी डॉमिनिकाच्या तुरुंगात भेदरलेल्या अवस्थेत दिसला. ऐषोआरामत जगणाऱ्या मेहुल चोक्सीचा तुरुंगात जाताच माज उतरल्याचे त्याच्या फोटोवरुन दिसून येत आहे. चोक्सीची डॉमिनिका पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. डॉमिनिकाच्या कोर्टात चोक्सीच्या वकिलांनी त्याला प्रत्यक्ष हजर होऊन बाजू मांडण्याची याचिका दाखल केली आहे. तर दुसऱ्या बाजूला चोक्सीला कायदेशीर मदत कोर्टाकडून नाकारण्यात आली आहे. देशात बेकायदेशीर प्रवेश केल्याचा ठपका मेहुल चोक्सीवर डॉमिनिका सरकारने ठेवला आहे. दरम्यान, चोक्सीच्या वकिलांना दोन मिनिटांसाठी भेट घेण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यावेळी चोक्सीचा फोटो टिपण्यात आला आहे. फोटोत चोक्सी घाबरलेला आणि बिथरलेला दिसत आहे. त्याचा डावा डोळा लाल झाला आहे. तसेच त्याने कोठडीत डाव्या हाताला झालेल्या जखमा दाखवल्या आहेत. मेहुल चोक्सीने जॉली हार्बर येथून अपहरण झाल्याचा दावा चोक्सीचे वकील वेन मार्श यांनी केला आहे. अँटिग्वामधील जॉली हार्बर येथून एका भारतीय वंशाच्या व्यक्तीने चोक्सीला बोटीतून डॉमिनिका येथे आणले. यावेळी अँटिग्वाचे पोलीस देखील या बोटीवर होते. या दरम्यान चोक्सीला मारहाण झाली असून चोक्सीच्या अंगावर अनेक जखमा आहेत असे वकिलाने म्हटलं आहे. त्यामुळे चोक्सीच्या जीविताला धोका असल्याचे संशय वकिलाने न्यायालयात केला आहे. चोक्सीच्या अटकेबाबत त्याच्या वकिलाने संशय व्यक्त केला आहे. चोक्सीला न्यायालयात हजर राहून बाजू मांडण्याची (a habeas corpus petition) संधी मिळावी, अशी विनंती करणारी याचिका चोक्सीच्या वकिलाकडून डॉमिनिकाच्या कोर्टात दाखल करण्यात आली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3pa55qH
No comments:
Post a Comment