टोरंटो: करोना महासाथीच्या आजारावर मात करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अनेक देशांनी करोना लसीकरणावर भर दिला आहे. लसीकरणासाठी अधिकाधिक नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आता कॅनडाने १२ ते १५ वर्षाच्या मुलांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. कॅनडाच्या आरोग्य विभागाने फायजरच्या लशीला मंजुरी दिली आहे. कॅनडाच्या आरोग्य विभागाच्या मुख्य आरोग्य सल्लागार सुप्रिया शर्मा यांनी बुधवारी याला दुजोरा दिला. त्यांनी सांगितले की, या निर्णयामुळे मुलांना सामान्यपणे आयुष्य जगण्याची संधी मिळणार आहे. कॅनडामध्ये १६ व त्या वरील वयोगटाचे लसीकरण सुरू आहे. वाचा: अमेरिकेत लवकरच परवानगी करोनाच्या संसर्गाशी दोन हात करत असलेल्या अमेरिकेत लसीकरण वेगाने करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेत आता १२ ते १५ या वयोगटाचे लसीकरण होण्याची शक्यता आहे. येत्या आठवड्याभरात या वयोगटासाठी विकसित करण्यात आलेल्या लशीबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने दिली. पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी बहुतांशी मुलांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असणार आहे. वाचा: वाचा: चाचणीत सकारात्मक परिणाम अमेरिकन औषध निर्मिती कंपनी फायजरने ही १२ ते १५ या वयोगटासाठी विकसित केली आहे. मार्च महिन्याच्या अखेरिस फायजरने १२ ते १५ वर्ष या वयोगटातील २२६० स्वयंसेवकांची लस चाचणी केली होती. या चाचणीत लस घेतलेल्या मुलांमध्ये कोविडची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. या चाचणीत सहभागी झालेल्या बालकांना लस घेतल्यानंतर प्रौढांसारखेच दुष्परिणाम जाणवू लागले होते. यामध्ये थंडी वाजणे, थकवा येणे, ताप येणे आदी लक्षणे जाणवली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3nQE8aV
No comments:
Post a Comment