Breaking

Saturday, May 8, 2021

'खान चाचा रेस्टॉरन्ट'मध्ये ऑक्सिजनचा काळाबाजार उघड, मालक फरार https://ift.tt/3xSCIkO

नवी दिल्ली : करोनाच्या दुसऱ्या लाटेत देश पुरता अडकलेला असतानाच दुसरीकडे वैद्यकीय साहित्य आणि ऑक्सिजनचा काळाबाजाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. शुक्रवारी दिल्लीतल्या खान मार्केटमध्येही असाच एक प्रकार उघडकीस आला. दिल्ली पोलिसांनी दोन रेस्टॉरन्टवर छापे टाकत १०० हून अधिक (हवेतून ऑक्सिजन वेगळं करणारं यंत्र) जप्त करण्यात आले आहेत. शनिवारी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे () सोपवण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिलीय. खान मार्केटमध्ये दिल्ली पोलिसांचे छापे दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी खान मार्केट परिसरातील ''मधून ९६ तर 'टाऊन हॉल रेस्टॉरन्ट'मधून ९ ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर जप्त करण्यात आले. सोबतच, दक्षिण दिल्लीतील लोधी कॉलनीमधून गौरव खन्ना, सतीश सेठी, विक्रांत आणि हितेश या चार जणांना अटक करण्यात आली. या चौघांवर ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरचा करण्याचा आरोप आहे. त्यानंतर या टोळीकडे पोलिसांना एकूण ४१९ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सापडले. १६ हजार रुपयांना खरेदी करण्यात आलेले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर गरजू नागरिकांना ५० हजारांना विकले जात होते. रेस्टॉरन्ट मालकाचं नाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'खान चाचा रेस्टॉरन्ट' आणि 'टाऊन हॉल रेस्टॉरन्ट'च्या मालकाचं नाव नवनीत कालरा असं आहे. कालराच्या लोधी कॉलनीस्थित सेंट्रल मार्केटच्या 'नेगी जू रेस्टॉरन्ट' आणखीन एका रेस्टॉरन्टवर बुधवारी छापे टाकत ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर जप्त केले होते. इथे लॅपटॉप घेऊन बसलेला एक व्यक्ती ऑनलाईन ऑर्डर स्वीकारत होता. पोलिसांना या ठिकाणी कॉन्सेन्ट्रेटरचे ३२ डबे, थर्मल स्कॅनर तसंच एन ९५ मास्क असं सामान आढळलं. आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, काळ्याबाजारासाठी हे सामान छतरपूरच्या एका गोदामात साठवून ठेवण्यात आलं होतं. कोण आहे नवनीत कालरा? पोलिसांनी हे रेस्टॉरन्ट सील केले असून रेस्टॉरन्टचा मालक नवनीत कालरा मात्र आपल्या कुटुंबीयांसोबत फरार आहे. दिल्ली पोलिसांनी छापे टाकल्याचं समजताच आपला मोबाईल फोन बंद करत कालरा अंडरग्राऊंड झाला. आरोपी नवनीत कालरा हा एक प्रसिद्ध व्यापारी आहे. दयाल ऑप्टिकल्स, खान चाचा, नेगे अॅन्ड ज्यू, टाऊन हॉल रेस्टॉरन्ट बार, मिस्टर चाऊ असे अनेक त्याच्या मिळकतीचे स्रोत आहेत. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, वैद्यकीय साहित्याच्या काळ्याबाजार प्रकरणाचा मास्टरमाईंड नवनीत कालरा आहे. त्याला शोधून काढण्यासाठी दिल्ली पोलिसांचा तपास सुरू आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3y6tKAG

No comments:

Post a Comment