Breaking

Friday, May 7, 2021

चुकीच्या धोरणांमुळे आत्मनिर्भर म्हणून घेणाऱ्या देशावर ही वेळ आली; शिवसेनेचा मोदींवर निशाणा https://ift.tt/3xX8n4r

मुंबई: देशात निर्माण झालेल्या करोनाच्या भीषण परिस्थितीवरून शिवसेनेने यांच्यावर निशाणा साधला आहे. भारतापासून जगाला धोका असल्याची चिंता आता युनिसेफनेही व्यक्त केली आहे. करोना ज्या वेगाने भारतात पसरत आहे त्यापासून संपूर्ण जग संकटात येईल. त्यामुळे भारताला करोनाविरुद्ध लढण्यासाठी इतर देशांनी मदत जास्तीत जास्त मदत करावी असे युनिसेफतर्फे सांगण्यात आले आहे. राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे आत्मनिर्भर म्हणवून घेणाऱ्या भारतावर ही वेळ आली असून सन्माननीय पंतप्रधान महोदय २० हजार कोटींचा महत्वाकांक्षी सेंट्रल विस्टा प्रकल्प थांबवायला तयार नाहीत. दिल्लीत नवे संसद भवन, त्यात पंतप्रधानांचा नवा कोरा महाल असा या योजनांवर हजारो कोटी रुपये उधळायचे व त्याच देशाने बांगलादेश, भूतान, श्रीलंकासारख्या देशांकडून करोना निवारणासाठी मदत स्वीकारायची, याची खंत वाटू नये याचे आश्चर्य वाटते असे शिवसेनेने म्हटले आहे. ( has criticized prime minister modi and union govt over the corona situation in the country) 'भारत नेहरू-गांधी यांनी निर्माण केलेल्या व्यवस्थेवर तग धरून आहे' शिवसेनेने सामना या मुखपत्रातील अग्रलेखाद्वारे हा निशाणा साधला आहे. बांगलादेशने भारताला १० हजार रेमडेसिवीर वायल्स देणगी दाखल पाठवले. भूतानसारख्या देशाने ऑक्सिजन पाठवला. नेपाळ, म्यानमार, श्रीलंकासारखे देशही आत्मनिर्भर भारताला मदतीचा हात पुढे करीत आहेत. स्पष्ट सांगायचे तर आजही भारत तग धरून आहे तो नेहरू-गांधी यांनी निर्माण करून ठेवलेल्या व्यवस्थेवर. नाहीतर कोरोनाच्या लाटेत सव्वाशे कोटी लोक कधीच नष्ट झाले असते, असे अग्रलेखात म्हटले आहे. भारतातील पेटलेल्या चितांचा धूर आजूबाजूच्या देशांना गुदमरून टाकत आहे. या धुरातून कोरोना आपल्या देशात पसरू नये यासाठी अनेक गरीब देशही भारताला दयाबुद्धीने मदत करू लागले आहेत. कधीकाळी ही वेळ पाकिस्तान, रवांडा, कोंगोसारख्या देशांवर येत असे. आज राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे ही वेळ आत्मनिर्भर म्हणवून घेणाऱ्या भारतावर आल्याची टीका अग्रलेखात करण्यात आली आहे. क्लिक करा आणि वाचा- 'भाजपचे लोक ममतांची कोंडी करण्याचा नाद सोडायला तयार नाहीत' कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धुमाकूळ सुरू असताना तिसऱया लाटेची धडक यापेक्षा जोरात बसेल, असे तज्ञ सांगतात. पण भाजपचे लोक आजही प. बंगालात ममता बॅनर्जी यांची राजकीय कोंडी करण्याचा नाद सोडायला तयार नाहीत. गेल्या १० दिवसांत भारतात ३६,११० करोना बळी गेले. हे आकडे धडकी भरवणारे आहेत. अमेरिका, ब्राझिलला आपण मागे टाकले. हे चित्र बरे नाही. भारतात विमान आणि प्रवासबंदी केली. याचा आर्थिक फटका भारताला बसत आहे. पंतप्रधान मोदी यांनी देश सावरण्यासाठी कठोर परिश्रम आणि राजकारणविरहित राष्ट्रवादाचा विचार करावा लागेल. जागतिक मंचावर भारताची अवस्था बिकट होणे बरे नाही, अशा शब्दात शिवसेनेने जोरदार टीकास्त्र सोडले आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2Q25qPa

No comments:

Post a Comment