Breaking

Thursday, May 27, 2021

युद्धग्रस्त सीरियात बशर असद चौथ्यांदा राष्ट्रपती; अमेरिकेचा संताप https://ift.tt/3yKlN4j

दमिश्क: मागील एक दशकापासून युद्धग्रस्त असलेल्या सीरियामध्ये चौथ्यांदा हे चौथ्यांदा राष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत. असद यांना जवळपास एक कोटी ४२ लाख मते मिळाली. या विजयासह बशर असद यांच्याकडे पुढील सात वर्षांसाठी सीरियाची सत्ता असणार आहे. दरम्यान निवडणूक निकालानंतर अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी सीरियाच्या निवडणूक प्रक्रियेवर संताप व्यक्त केला आहे. ही निवडणूक स्वतंत्र, निष्पक्ष पद्धतीने झाली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. सीरियामध्ये गृहयुद्ध सुरू झाल्यानंतर दुसऱ्यांदा असद निवडणुकीत विजयी झाले आहेत. सीरियातील गृहयुद्धात जवळपास ४ लाख लोक ठार झाले असून लाखोंनी स्थलांतर केले आहे. देशातील पायाभूत सुविधाही ढासळली आहे. सीरियात सातत्याने होणारे बॉम्बस्फोट, हवाई हल्ले यामुळे देशातील बहुतांशी भागाचे नुकसान झाले आहे. वाचा: असद यांना ९५ टक्के मते असद यांना एकूण ९५ टक्के मते मिळाली. वर्ष २०१४ मध्ये झालेल्या मागील निवडणुकीत असद यांना ८८ टक्के मते मिळाली होती. या निवडणुकीत असद यांचे मताधिक्य वाढले आहे. त्यांच्या विरोधात उभे असलेले अब्दुलल्ला सालोम अब्दुला आणि महमूद मेरही या उमेदवारांना १.५ टक्के आणि ३.३ टक्के मते मिळाली. वाचा: वाचा: विरोधकांकडून टीका सीरियातील विरोधी पक्षांनी या निवडणूक प्रक्रियेवर नाराजी व्यक्त केली. असद यांना रशियाचा पाठिंबा आहे. त्यामुळे अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांनी या निवडणुकीच्या निकालावर संताप व्यक्त केला आहे. असद सत्तेवर असेपर्यंत निष्पक्ष निवडणूक होणे अशक्य असल्याचे त्यांनी म्हटले. सीरियाच्या उत्तरपूर्व भागावर मतदान झाले नाही. या भागावर अमेरिकेचा पाठिंबा असलेल्या कुर्दिश लढाऊंचा ताबा आहे. तर, उत्तर पश्चिम इदलिब प्रांतातही मतदान झाले नाही. या ठिकाणी बंडखोरांचा ताबा आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3bVI7y8

No comments:

Post a Comment