नवी दिल्ली : भारतात राष्ट्रीय स्तरावरच्या करोनाच्या आकड्यांवर नजर टाकली असता संक्रमणाचा वेग कमालीचा घसरल्याचं दिसून येतंय. त्यामुळे, करोना संक्रमणाची दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्रं आहे. अनेक राज्यांची आकडेवारीही समाधानकारकरित्या खाली जाताना दिसून येतेय. उल्लेखनीय म्हणजे, सोमवार आणि मंगळवारी 'तौत्के' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात या राज्यांत पार पडलेल्या चाचण्यांची संख्येतही घट झालेली दिसून आली. बुधवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात मंगळवारी (१८ मे २०२१) २ लाख ६७ हजार ३३४ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर याच २४ तासांत तब्बल ४५२९ रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. हा आजवरचा एका दिवसातला सर्वाधिक आकडा ठरलाय. याअगोदर, मंगळवारीदेखील ४३१९ रुग्णांनी आपले प्राण गमावले होते. याचसोबत, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ५४ लाख ९६ हजार ३३० वर पोहचलीय. तर आतापर्यंत देशात एकूण २ लाख ८३ हजार ७१९ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. मात्र, देशात आत्तापर्यंत २ कोटी १९ लाख ८६ हजार ३६३ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. देशात सध्या ३२ लाख २६ हजार ७१९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
- एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : २ कोटी ५४ लाख ९६ हजार ३३०
- एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : २ कोटी १९ लाख ८६ हजार ३६३
- उपचार सुरू : ३२ लाख २६ हजार ७१९
- एकूण मृत्यू : २ लाख ८३ हजार ७१९
- करोना लसीचे डोस दिले गेले : १८ कोटी ५८ लाख ०९ हजार ३०२
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3yfQoqa
No comments:
Post a Comment