Breaking

Monday, May 17, 2021

LIVE : गुजरातला धडकल्यानंतर 'तौत्के' चक्रीवादळाचा वेग मंदावला https://ift.tt/3bwwtd2

नवी दिल्ली : गुजरातसाठी गेल्या दोन दशकांतील सर्वात भयंकर वादळ ठरलंय. सोमवारी रात्री तौत्केनं गुजरातला धडक दिली. त्यानंतर मात्र, या चक्रीवादळाचा वेग काहिसा कमी झालेला दिसून येतोय. LIVE अपडेट :
  • हवामान विभागानं केलेल्या एका ट्विटमध्ये चक्रीवादळाचा वेग कमी झाल्याचं म्हटलंय.
  • दक्षिण - पश्चिम राज्यांमध्ये चक्रीवादळानं हाहाकार उडवून दिला. यावेळी जवळपास ताशी १९० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची नोंद झालीय.
  • गुजरातमध्ये वादळ जमिनीवर धडकल्यानंतर (Cyclone Landfall) वीज सेवा कोसळली. तसंच अनेक झाडं उन्मळून कोसळली. या चक्रीवादळात अनेक घरांचंही मोठं नुकसान झालंय.
  • सोमवारी केरळ आणि कर्नाटकनंतर महाराष्ट्र, दमन - दीव, गुजरातच्या समुद्रकिनारी भागांना या चक्रीवादळाचा जोरदार झटका बसलाय
  • सोमवारी दुपारी महाराष्ट्रात जोरदार धडक दिल्यानंतर अनेक ठिकाणी वेगानं वाहणारे वारे, वादळ आणि मुसळधार पावसाचं चित्र दिसलं. त्यानंतर रात्री या वादळानं गुजरातमध्ये प्रवेश केला.
  • चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं समुद्रकिनारी भागात राहणाऱ्या जवळपास दोन लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवल्याचं सांगण्यात येतंय.
  • अरबी समुद्रात ४१० लोकांसहीत दोन जहाजं भटकलेली समोर आलं होतं. नौसेनेकडून त्यांचा शोध सुरू आहे. परंतु, भयंकर वादळात त्यांचा अद्यापही पत्ता लागलेला नाही.
  • महाराष्ट्राला धडक दिल्यानंतर हे चक्रीवादळ आता गुजरातच्या अनेक भागांत घोंघावतंय.
  • तौत्केला तोंड देण्यासाठी मोठी तयारी करण्यात आली असतानाही तौत्केचं अक्राळ-विक्राळ रुप पाहायला मिळालं.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2S3JW5a

No comments:

Post a Comment