नागपूर : करोना विषाणू प्रकोपाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाल्यानंतर जिल्ह्यातील संशयितांमधून नवे रुग्ण सापडण्याचा सरासरी दर १७ टक्क्यांवर वधारला होता. तर एका बाजूला अहवालात निगेटिव्ह येण्याचा दर मात्र, जवळजवळ ८० टक्क्यांवर होता. मात्र, सुदैवाने तीन महिन्यांनंतर का होईना ही लाट आता ओसरू लागली आहे. करोना विषाणूचे नवे रुग्ण न सापडण्याची सरासरी आता 98 टक्क्यांवर तर पॉझिटिव्ह रुग्णांचा दर 1.7 पर्यंत गडगडला आहे. त्यामुळे नागपूरकरांसाठी ही दिलासा देणारी बाब ठरत आहे. पॉझिटिव्हिटीचा दर सातत्याने घसरत असल्याने लॉकडाऊनमध्ये बंद झालेले व्यवहार अनलॉक होण्याच्या शक्यतेला बळ मिळत आहे. शुक्रवारी जिल्हा प्रशासनाने करोनाचा संसर्ग झाल्याच्या शक्यतेतून 11 हजार 354 जणांची करोना चाचणी केली. त्यातील 98 टक्के रुग्ण निगेटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. नागपूरला अंशत: दिलासा देणारी बाब म्हणजे जिल्ह्यात आज नव्याने करोनाची बाधा झालेल्यांची संख्या सलग तिसऱ्या दिवशी 200 च्या खाली घसरली आहे. आजचे पॉझिटिव्ह - 197 एकूण चाचण्या - 11,354 अॅक्टिव्ह बाधित - 4575 आजचे मृत्यू - 10 करोना जीवघेण्या आजारातून बाहेर पडणाऱ्यांचा सरासरी दर 97 टक्क्यांवर कायम आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत 8943 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3z3pYIH
No comments:
Post a Comment