मुंबई: संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यभरात धार्मिक कार्यक्रम, यात्रा व उत्सवांवर निर्बंध आहेत. वारकऱ्यांनी वारीचा आग्रह धरू नये असं राज्य सरकारचं आवाहन आहे. मात्र, यंदा पायी वारी झालीच पाहिजे अशी भूमिका भारतीय जनता पक्षानं घेतली आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्ये जुंपली आहे. (BJP Vs NCP Over ) पंढरीची वारी हा महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांसाठी एक आनंदसोहळा असतो. विठ्ठलाच्या ओढीनं लाखो वारकरी दरवर्षी पंढरीची वाट चालत असतात. शेकडो वर्षांपासून ही परंपरा अखंड सुरू आहे. मात्र, करोनाच्या भयंकर संकटामुळं मागील वर्षी पायी वारीच्या सोहळ्यामध्ये खंड पडला होता. वाचा: आता आषाढी वारी जवळ आल्यानं त्यावरून पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे. यावर्षी पायी वारी झालीच पाहिजे, असा आग्रह भाजपनं धरला आहे. निर्बंधासह का असेना, पण पायी वारी व्हावी अशी वारकऱ्यांची इच्छा असल्याचा दावा भाजपनं केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळकाढूपणा न करता त्वरीत वारकऱ्यांसोबत चर्चा करुन नियमावली तयार करावी. पायी वारीच्या बाबतीत यंदा आम्ही कोणतीही तडजोड स्वीकारणार नाही,' असा इशारा भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे यांनी दिला आहे. वाचा: भाजपच्या या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसनं कडाडून हल्ला चढवला आहे. 'तुषार भोसले हा वारकऱ्यांचा प्रतिनिधी नसून वारकऱ्यांच्या जिवाशी खेळणारा एक भोंदू व्यक्ती आहे. हा माणूस वारी व्हावी अशी मागणी आज करतोय. पण, या वारीमध्ये करोनाचा संसर्ग वाढल्यास आमच्या वारकरी बांधवांच्या जीविताला जो धोका निर्माण होईल, त्याविषयी या माणसाला काहीच घेणेदेणे नाही,' असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते यांनी म्हटलं आहे. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3ceU1Dx
No comments:
Post a Comment