सिंधुदुर्ग: बाधित रुग्णांसाठी छोटासा आनंदाचा क्षणही मोलाचा ठरताना दिसत आहे. त्यात तुमच्या मनात घर केलेली एखादी व्यक्ती तुमच्यापर्यंत आल्यास आनंदात आणखीच भर पडते. असेच काहीसे चित्र जिल्ह्यातील येथील कोविड केअर सेंटरमध्ये शनिवारी पाहायला मिळाले. ' चला हवा येऊ द्या ' या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहचलेला विनोदवीर अभिनेता या कोविड सेंटरमध्ये आला आणि सगळ्यांचेच चेहरे खुलले. भाऊ कदमने यावेळी धीराचे चार शब्द बोलून सर्वांचीच मने जिंकली. भाऊचा मालवणीतील आपुलकीचा संवाद सर्वांनाच भावला. ( ) वाचा: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील सावडाव हे भाऊ कदम याचे मूळगाव. गावाशी आजही त्याची नाळ घट्ट जुळलेली आहे. त्यामुळेच सुखदु:खाच्या अनेक क्षणांत त्याचे पाय गावाकडे वळतात. सध्या सिंधुदुर्ग जिल्हा कोविडशी लढा देत आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातूनच कोविड विरुद्ध लढा देण्यासाठी आरोग्य सुविधा वाढवल्या जात आहेत. त्यात ठिकठिकाणी कोविड सेंटर्स उभी राहत आहेत. या लढ्यात कणकवली नगरपंचायतही नेटाने काम करताना दिसत आहे. कणकवली नगरपंचायतच्यावतीने मुडेश्वर मैदान येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले असून भगवती मंगल कार्यालय येथे १०० बेड्सचे कोविड केअर विलगीकरण केंद्र उभारण्यात येत आहे. तिथे कॉमेडीकिंग भाऊ कदमने प्रत्यक्ष भेट दिली व सर्वांशी संवादही साधला. वाचा: 'कणकवलीतील सावडाव ह्या माझा गाव. इकडे कोविड सेंटर उभारल्याचा माका समाजला आणि मी इलंय', असे मालवणी उद्गार काढतच भाऊ कदमने कणकवली नगरपंचायतीच्या कामाचे कौतुक केले. या संकटाच्या काळात सुविधा निर्माण करत असताना माझ्याकडून काही मदत लागल्यास नक्की हाक मारा, असेही भाऊ यावेळी म्हणाला. राज्यभरात करोनाचा प्रादुर्भाव आहे. जिल्ह्यातही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मोठ्या शहरांत रुग्णांना बेड्स उपलब्ध नाहीत अशी स्थिती आहे. अशावेळी माझ्या कणकवली गावात नगरपंचायतीने कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून रुग्णांची काळजी वाहण्याचे जे मोठे काम हाती घेतले आहे ते खूपच मोठे आहे, असे भाऊ म्हणाल. यावेळी त्याच्यासोबत नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, मुख्याधिकारी अवधूत तावडे उपस्थित होते. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3ptQPsX
No comments:
Post a Comment