नवी दिल्लीः काँग्रेसचे माजी अध्यक्ष ( ) यांनी एकाच दिवसात पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांना, निकटवर्तीयांना आणि पत्रकारांना ट्वीटरवर अनफॉलो केल्याने खळबळ उडाली आहे. केरळच्या वायनाडमधील लोकसभा खासदार असलेले राहुल गांधी यांनी आपल्या संसदीय कार्यालयाचे काही जण आणि दिल्लीतील काही वरिष्ठ पत्रकारांनाही अनफॉलो केले. यानंतर काँग्रेस पक्षाकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आलं. राहुल गांधींचे अकाउंट चे रिफ्रेश केले जात आहे. ते लवकरच नव्या रणनीतीसोबत येतील, असं काँग्रेसने म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी पक्षात केल्याचा आरोप करत काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी तक्रार केली होती, असं काही मीडिया रिपोर्ट्समधून सांगण्यात येतंय. याविरोधा राहुल गांधी यांनी ही अॅक्शन घेतली आहे. तर काँग्रेस पक्षात तरुण आणि ज्येष्ठ नेत्यांमधील हे गृह कलहाचे संकेत असल्याचं बोललं जात आहे. राहुल गांधी यांनी आपले प्रमुख सहकारी के. बी. बायजू, निखिल आणि निवेदिता अल्वा, कौशल विद्यार्थीसह अलंकार सवाई यांना अनफॉलो केलं. यासह त्यांनी २८१ जणांना अनफॉलो केलं. नंतर ही संख्या कमी होऊन २१९ इतकी झाली. 'अकाउंट रिफ्रेश केलं जातंय' राहुल गांधींचे अकाउंट रिफ्रेश केलं जात आहे. त्यानुसार हे काम केले जात आहे. लवकरच एका रणनीतीसोबत ते परततील आणि नव्या यादीसह ते अनेकांना फॉलो करतील. यात आता ज्यांना अनफॉलो केले आहे, त्यांचाही समावेश असू शकतो, असं काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितलं. राहुल गांधी हे आगामी रणनीतीनुसार काम करत आहेत, असं मीडिया रिपोर्ट्समधून सांगण्यात येतंय. करोनाच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी सोशल मीडियावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेला फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. कोविड नव्हे तर मोविड आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी अलिकडेच केली होती.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3g8OQWT
No comments:
Post a Comment