Breaking

Monday, June 28, 2021

अनिल देशमुखांना अटक होईल, मी ईडीला सर्व पुरावे दिले आहेत: अॅड जयश्री पाटील यांचा दावा https://ift.tt/3h1LNl1

मुंबई: माजी गृहमंत्री यांच्या विरोधातील सर्व पुरावे मी सक्तवसुली संचालनालयाला () दिले असून अनिल देशमुख यांना नक्कीच अटक होईल, अशी प्रतिक्रिया अॅड. जयश्री पाटील यांनी दिली आहे. देशमुख यांच्या दोन सहकाऱ्यांना यापूर्वीच अटक झालेली आहे. आता ईडीने देशमुख यांना बोलावले आहे. माझ्या देशाच्या राज्यघटनेवर आणि कायद्यावर पूर्ण विश्वास आहे, असेही त्या म्हणाल्या. ( has claimed that will be arrested) अॅड. जयश्री पाटील या प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलत होत्या. अनिल देशमुख यांना अटक होईल असा विश्वास व्यक्त करताना पाटील म्हणाल्या की, 'मी ईडीने केलेल्या कारवाईवर समाधानी आहे. सीबीआयने दाखल केलेला गुन्हा हा माझ्या तक्रारीवर उच्च न्यायालयाने जे निर्देश दिले आहेत त्यानुसार दाखल केला आहे. ईडीने देखील माझ्या तक्रारीवरच माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारवाई केलेली आहे, असे अॅड पाटील म्हणाल्या. क्लिक करा आणि वाचा- 'देशमुखांना अटक न केल्यास ते पुरावे नष्ट करू शकतात' मी अनिल देशमुख यांच्याविरोधातील सगळी माहिती दिलेली आहे. जे अनिल देशमुखांच्या भ्रष्टाचाराने पिळले गेले आहेत अशा पीडित लोकांचीही माहिती दिली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना अटक करायलाच पाहिजे. जर त्यांना अटक केली गेली नाही, तर ते पुरावे नष्ट करु शकतात, असेही अॅड. पाटील पुढे म्हणाल्या. क्लिक करा आणि वाचा- अँटिलिया स्फोटके प्रकरणा डीवीआर अजून सापडलेला नाही. अनिल देशमुख यांच्या दोन सहकाऱ्यांना ईडीने नुकतीच अटक केलेली आहे. या कारवाईनंतर ईडीने अनिल देशमुख यांनाही कार्यालयात चौकशीसाठी बोलावले आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांनाही अटक होईल, असे अॅड. पाटील यांनी म्हटले आहे. मला धमक्याही आल्या- अॅड. जयश्री पाटील या प्रकरणापासून दूर होण्यासाठी मला धमकीचे फोन आले. माझ्यावर दबाव टाकण्यात आला. त्याचे सगळे पुरावे देखील मी दिले आहेत. या दबाव टाकण्याच्या प्रकरणाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा देखील सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी माझ्यावर कशाप्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न केला त्याबाबत सविस्तर माहिती मी ईडीला दिलेली आहे. माझा देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. अनिल देशमुख यांच्यावर शरद पवार यांचा हात असला तरी त्यांना अटक होईल, असा दावा पाटील यांनी केला आहे. क्लिक करा आणि वाचा- अनिल देशमुख यांना चौकशीसाठी बोलावले आहे हे ऐकून मी अतिशय आनंदी आहे. त्यांना या प्रकरणात अटक होऊन त्यांना शिक्षा होईल असे मला वाटते, असेही त्या शेवटी म्हणाल्या.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3jmiTgU

No comments:

Post a Comment