नवी दिल्लीः करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात गंभीर स्थिती निर्माण केली असताना तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याचं सांगण्यात येतंय. केंद्र सरकारनेही त्या दृष्टीने तयारी सुरू आहे. दुसरीकडे २ ते १८ वर्षांवरील मुलांसाठी लसीची ( ) मागणी होते. यापार्श्वभूमीवर कोवॅक्सिन लसीची चाचणी मुलांवर सुरू झाली आहे. पण या चाचणीविरोधात दिल्ली हायकोर्टात ( ) एक याचिका दाखल करण्यात आली आहे. यात करोनावरील लसीची लहान मुलांवरील चाचणी ( ) म्हणजे एक प्रकारचा नरसंहार आहे आणि तातडीने रोखली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या चाचणीला मंजुरी दिली आहे. मुलांवरील लसीच्या चाचणीसंदर्भातील एक अर्ज हायकोर्टासमोर आहे. या प्रकरणी केंद्र सरकार आणि भारत बायोटेकला नोटीसही पाठवण्यात आली आहे. तरीही जूनपासून लहान मुलांवर लसीची चाचणी सुरू करण्यात आली आहे, असं याचिकाकर्ते संजीव कुमार यांनी म्हटलं आहे. मुलांना व्हॉलेंटियर्स म्हणणं चुकीचं, त्यांना कळतही नाहीः याचिकाकर्ता कोर्टाने आपल्या सुनावणीदरम्यान याचिकेवर स्थगिती दिलेली नाही. तरीही केंद्र सरकारने चाचणी सुरू केली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी ही १५ जुलैला होणार आहे. यामुळे चाचणी झाली आहे, असं केंद्र सरकार आता कोर्टाला सांगू शकतं. यामुळे याचिका दाखल करण्याला काहीच अर्थ उरत नाही. लसीची चाचणी मुलांवर केल्याने त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. याचीच आम्हाला चिंता आहे, असं याचिकाकर्ते संजीव म्हणाले. ज्या मुलांवर लसीची चाचणी केली जात आहे त्यांना व्हॉलेंटियर्स म्हणता येणार नाही. कारण या मुलांमध्ये चाचणीचे निष्कर्ष समजण्याची क्षमता नाही. स्वस्थ मुलांवर लसींची चाचणी म्हणजे नरसंहारासारखंच आहे. एखाद्या निष्पाप मुलाचा या चाचणीत जीव गेला तर चाचणी सहभागी असलेले आणि चाचणीला परवानगी देणाऱ्यांविरोधात गुन्हेगारी स्वरुपाचा खटला भरला पाहिजे, असं ते म्हणाले. ५२५ व्हॉलेंटियर्सवर लसीची चाचणी होईलः आरोग्य मंत्रालय ५२५ स्वस्थ व्हॉलिंटियर्सवर लसीची चाचणी केली जाईल. त्यांना दोन डोस दिले जातील. पहिला डोस दिल्यानंतर २८ दिवसांनी व्हॉलिंटियर्सना दुसरा डोस दिला जाईल. कोवॅक्सिनची लस चाचणी दिली जाईल, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. या लसीचा उपयोग सध्या देशात केला जात आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3fLt903
No comments:
Post a Comment