चेन्नईः करोना व्हायरसचा संसर्ग हा आता वन्य प्राण्यांनाही होत आहे. चेन्नईजवळ ( ) असलेल्या वंडालूर अरिग्नार अण्णा प्राणिसंग्रहालयात ( ) करोनाने एका सिंहिनीचा मृत्यू झाला ( ) आहे. प्राणिसंग्रहालयातील ९ वर्षांच्या निला नावाच्या सिंहिनीचा ३ जूनला संध्याकाळी ६.१५ वाजता करोनाने मृत्यू झाला. निला सिंहिनीला करोनाचा संसर्ग झाला होता. ती पॉझिटिव्ह होती. एक दिवसापूर्वीच तिच्या नाकातून स्त्राव येत होता, अशी माहिती देण्यात आली आहे. प्राणिसंग्रहालयातील ११ पैकी ९ सिंहांचा करोना चाचणी रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये विष्टा आणि स्वॅबची चाचणी भोपाळमध्ये करण्यात आली होती. त्यांच्या रिपोर्टची पडताळणी करण्यासाठी भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था (बरेली) आणि सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (हैदराबाद) येथे पाठवण्यात आले आहेत. सध्या सर्व सिंहांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. वाघ आणि सिंहामध्ये करोनाचा संसर्ग हा सर्वप्रथम बार्सिलोना (स्पेन) आणि अमेरिकेतील ब्रोंक्स प्राणिसंग्रहालयात आढळून आला होता. भूक न लागणे आणि खोकल्याचे लक्षण संसर्गाची लक्षणं ही २६ मे रोजी समोर आली होती. प्राणिसंग्रहालयातील अॅनिमल हाउस १ मध्ये ठेवण्यात आलेल्या ५ सिंहांमध्ये एनोरेक्सिया (भूक न लागणं) आणि अधून-मधून खोकला येत असल्याची लक्षणं दिसली. सिंहांच्या रक्ताचे नमुने हे तामिळनाडू पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान विद्यापीठात पाठण्यात आले, असं प्राणिसंग्रहालयाकडून सांगण्यात आलं. नाकातील स्वॅब, रेक्टल स्वॅब आणि ११ सिंहांच्या विष्टेचे नमुने भोपाळमधील संस्थेला पाठवले गेले. ही संस्था करोना व्हायरसची चाचणीसाठी अधिकृत असलेल्या ४ नामांकित संस्थांपैकी एक आहे. प्राणिसंग्रहालयातील सर्व कर्मचाऱ्यांना लस दिली गेली आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. हैदराबादमधील प्राणिसंग्रहालयाती ८ सिंह करोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. सिंहांना करोना संसर्ग होण्याची ही पहिलीच घटना होती. यानंतर काही दिवसांनी उत्तर प्रदेशातील इटावामध्ये एक सिंह करोना पॉझिटिव्ह आढळला होता.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3fTeFvi
No comments:
Post a Comment