Breaking

Wednesday, June 2, 2021

पोलीस 'पाच'पावलांवर तरीही कोविड सेंटरमधून चोरले २३ पंखे! https://ift.tt/3uL9Po3

नागपूर: तू गुन्हेगार आहेस, असं कधीच कोणाच्या कपाळावर गोंदवलेलं नसतं. पण काही जण कृतीतून हे सिद्ध करून दाखवतात. असाच काहिसा प्रकार शहरात घडलाय. तोही संकटाशी झुंजणाऱ्या नागपुरातील पोलीस वसाहतीजवळ. ऐकून धक्का बसेल… पण एकाने चक्क या पोलीस वसाहतीतल्या मधील २३ पंखे चोरले आहेत. इतक्यावरच तो थांबला नाही तर त्याने ३ पलंग आणि गाद्यांवरही हात साफ केलाय. येथील नळाच्या तोट्याही त्याने सोडलेल्या नाहीत. आश्चर्याची बाब म्हणजे पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावरील ठिकाणी या चोराने हा प्रताप करून दाखवलाय. ( ) वाचा: नागपूर शहरातील ठाण्यापासून अवघ्या काही पावलांवरील या क्वारंटाइन सेंटरवर पाळत ठेवत चोराने हा डल्ला मारलाय. विशेष म्हणजे 'कानून के हाथ लंबे होते है…' म्हणणाऱ्या पोलिसांना घराशेजारी घडत असलेल्या या चोरीची साधी खबरही नव्हती. दोन दिवसांपूर्वी पोलीस कमाल चौकात गस्त घालत असताना त्यांना नावाचा तरुण पाठीवर काही वस्तू घेऊन जाताना दिसला... संशय आल्याने पोलिसांनी त्याची झडती घेतली. तेव्हा त्यांनाही धक्काच बसला. खांद्यावरील बॅगमध्ये पंखा पाहून तेही चक्रावले. पोलिसी खाक्या दाखवून चौकशी केल्यावर त्याने तो पंखा पोलीस वसाहतीमधून लंपास केल्याचे त्याने कबूल केले. अशाच प्रकारे आपण पोलीस वसाहतीतल्या क्वारंटाइन सेंटरमधून २३ पंख्यांसह इतर साहित्य चोरल्याचेही त्याने मान्य केले. वाचा: पोलिसांनी त्याला अटक करून मोठ्या संख्येने चोरलेले पंखे व इतर मुद्देमाल जप्त केला आहे. चोरलेल्या साहित्यातील अनेक वस्तू विकल्याची कबुलीही त्याने चौकशीत दिली आहे. घटनेचे स्थळ पाचपावली पोलीस स्टेशन पासून अवघ्या काही पावलांवर आहे. पण तेच जर सुरक्षित नसेल तर उर्वरित शहरात कायदा सुव्यवस्थेची दशा काय असेल, असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2S6jWGr

No comments:

Post a Comment