Breaking

Thursday, June 3, 2021

संतापजनक! चक्क कोविड सेंटरमधून केली ऑक्सिजनची चोरी https://ift.tt/3vOqnwJ

: करोना काळात विविध गुन्हे ऐकण्यात आले आहेत. मात्र गंगापूर येथील कोविड सेंटरच्या परिसरात रूग्णांसाठी लावलेल्या मोठ्या ऑक्सिजन सिलेंडरमधून ऑक्सिजन चोरून छोट्या सिलेंडरमध्ये भरल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात गंगापूर उपजिल्हा रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. पवार यांनी गंगापूर पोलिस ठाण्याला तक्रार दिली. या प्रकरणात डॉ. पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, उपजिल्हा रूग्णालय, गंगापूर कोविड हेल्थ सेंटर येथे १ जून रोजी दुपारी २ वाजेच्या दरम्यान कोविड सेंटरमधील रूग्णांच्या उपचारासाठी लावण्यात आलेल्या दोन जम्बो ऑक्सिजन सिलेंडरमधून अनंत कुमावर नावाच्या व्यक्तीने ऑक्सिजन पाईपद्वारे मोठ्या सिलेंडरमधील ऑक्सिजन दोन छोट्या सिलेंडरमध्ये भरला. याबाबत त्याने कोणलाही विचारणा केली नाही. या पूर्वीही ऑक्सिजन चोरी झाल्याचा प्रकार घडलेला आहे, असंही त्यांनी आपल्या तक्रारीत नमुद केलं आहे. शहरात आधीच ऑक्सिजनचा तुटवडा आहे. अशातच ऑक्सिजन चोरीच्या या प्रकारामुळे रूग्णांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असंही डॉ. पवार यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. दरम्यान, करोना काळात आरोग्य सुविधांअभावी अनेक रुग्णांचे हाल झाले. मात्र अशा काळातही अनेक धक्कादायक प्रकार उघड झाले होते. करोना रुग्णाच्या मृत्यूनंतर अंगावरील सोने चोरणे, महिला रुग्णांची छेडछाड अशा भीषण घटनाही समोर आल्या. त्यामुळे समाजातील संवेदना हरवत चालली आहे का, असा प्रश्न या घटनांनंतर उपस्थित होत आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3z2NaGO

No comments:

Post a Comment