Breaking

Sunday, June 27, 2021

लाखो प्रवाशांची प्रतीक्षा संपणार; अंधेरी ते विरार १५ डबा लोकल लवकरच धावणार https://ift.tt/3x19EH9

म. टा. प्रतिनिधी, अंधेरी ते गर्दीतून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. आज, सोमवारपासून अंधेरी ते विरार धीम्या मार्गावर १५ डब्यांच्या सुरू होणार आहेत. राज्य सरकारने परवानगी दिलेली नसल्याने सध्या या गाड्यांतून सामान्य मुंबईकरांना प्रवास करता येणार नाही. यामुळे लोकल सुरू, मात्र प्रवेश नाही, अशी स्थिती आहे. लोकलमधील गर्दीमुळे करोना वाढण्याची भीती असल्याने मुंबई महापालिका आणि राज्य सरकारकडून सर्वांसाठी लोकल खुली करण्याचा निर्णय घेतला जात नाही. नेत्यांच्या ताफ्यात लोकार्पण सोहळे, उद्घाटने गर्दीतच पार पडत आहेत. रस्त्यांवर, बसमध्ये, बाजारात प्रचंड गर्दी आहे. यामुळे केवळ मुंबई लोकलमधील गर्दीमुळे करोना वाढतो की काय, असा खोचक सवाल रेल्वे प्रवाशांकडून उपस्थित होत आहे. अंधेरी ते विरार मार्गावरील १२ डब्यांच्या २५ लोकल आता १५ डब्यांसह धावणार आहेत. यात डाउन मार्गावरील १३ आणि अप मार्गावरील १२ लोकल फेऱ्यांचा समावेश आहे. यातील १८ धीम्या मार्गावर आणि ७ जलद मार्गावर धावतील. या गाड्यांमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांनाच प्रवासाची मुभा असणार आहे. या प्रकल्पांसाठी १४ स्थानकांतील २७ फलाटांचे विस्तारीकरण करण्यात आले. जोगेश्वरी आणि मालाड स्थानकातील पादचारी पुलांच्या पायऱ्यांचे काम करण्यात आले. त्याचबरोबर २८ ठिकाणांवरील सिग्नल यंत्रणेत आवश्यक बदल केले गेले. अंधेरी ते विरार मार्गावर १५ डब्यांच्या फेऱ्या सुरू केल्याने प्रवासी वाहन क्षमतेत २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले. अंधेरी ते विरार १५ डबा लोकल प्रकल्प मंजूर - २०१७-१८ (पिंकबूक तरतूद-२०१९-२०) प्रकल्प खर्च - ५९.५६ कोटी अंतर -४० किमी स्थानक -१४ फलाट विस्तारीकरण- २७ (किमान १० मी. ते कमाल १८० मी.) सिग्नल जागेत बदल - २८ पुलांची कामे - ६ लोकलमधील प्रवासी क्षमता १२ डब्यांची लोकल क्षमता - ३००० गर्दीच्या वेळेतील प्रवासी- ५५०० १५ डब्यांची लोकल क्षमता - ४२०० गर्दीच्या वेळेतील प्रवासी - ७०००


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3xTwvUS

No comments:

Post a Comment