Breaking

Monday, June 28, 2021

धक्कादायक! मृत शेतकऱ्याच्या नावावर कर्ज; आमदार संजय शिंदे यांच्या कारखान्यावर आरोप https://ift.tt/3y3CXss

: करमाळ्याचे अपक्ष आमदार (MLA ) यांच्या साखर कारखान्याने चक्क मृत शेतकऱ्याच्या नावे कर्ज उचलले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आमदार शिंदे यांच्या म्हैसगांव येथील विठ्ठल कॉर्पोरेशनने जिल्ह्यातील वेगवेगळ्या बँकांमधून शेतकऱ्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला असल्याची तक्रार मतदारसंघाचे माजी आमदार आणि आ.शिंदे यांचे प्रतिस्पर्धी नारायण पाटील यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली आहे. 'आमदार संजय शिंदे यांच्या विठ्ठल कॉर्पोरेशन या कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावे उचललेले कर्ज हे बेकायदेशीर असून शेतकऱ्यांना याबाबत कोणतीच कल्पना न दिल्याने शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. एवढंच नाही तर माढा तालुक्यातील अकुलगाव येथील आप्पा कृष्णा जगताप हे २२ जानेवारी २०११ रोजी मयत झाले आहेत. तरीही आ. संजय शिंदे यांच्या कारखाना व्यवस्थापनाने सन २०१३ साली त्यांच्या नावे कर्ज उचलले आहे. विशेष म्हणजे हयात असणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोक्यात या आमदाराने दगड घातलाच आहे, शिवाय मयताच्या नावे कर्ज घेऊन मढ्याच्या टाळूवरील लोणी ओरबाडून खाल्लं आहे,' असा गंभीर आरोप माजी आमदार नारायण पाटील यांनी केला. शिवसेना नेते संजय कोकाटे यांनी माढ्याचे आमदारद्वय शिंदे बंधू यांनी पंजाब नॅशनल बँक कोथरूड, बॅंक ऑफ इंडिया कुर्डुवाडी, युनियन बॅंक कुंभार वेस सोलापूर, एचडीएफसी बॅंक टेंभुर्णी, आयडीबीआय बॅंक टेंभुर्णी, बॅंक ऑफ इंडिया बार्शी, बॅंक ऑफ इंडिया करमाळा, रत्नाकर बॅंक अकलूज, स्टेट बॅंक ऑफ इंडिया बार्शी, महाराष्ट्र बॅंक कुर्डुवाडी, महाराष्ट्र बॅंक निमगाव अशा वेगवेगळ्या बॅंकांमधून आपल्या कुटुंबियांच्या कारखान्यांसाठी सुमारे ३०० कोटी रुपयांचा बोजा शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर चढवला असल्याचा आरोप केला आहे. तसंच कारखान्याने शेतकऱ्यांना फसवल्याने रस्त्यावर उतरण्याचा इशारा कोकाटे यांनी दिला आहे. दरम्यान, यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे, माढा तालुका भाजपाध्यक्ष योगेश बोबडे, रयत क्रांतीचे संपर्कप्रमुख सुहास पाटील, तालुकाध्यक्ष दत्तात्रय गायकवाड, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, रिपाइंचे परमेश्वर खरात, रासपचे शहरप्रमुख सुनिल बुजुर्के, मनसेचे सागर लोकरे, शिवसेनेचे विनोद पाटील आदी उपस्थित होते.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3gZW9Sg

No comments:

Post a Comment