Breaking

Thursday, July 29, 2021

देशातील २८ टक्के भागावर पावसाची अवकृपा https://ift.tt/2UUieJX

‌म. टा. विशेष प्रतिनिधी, आणि पश्चिम महाराष्ट्राच्या घाट परिसरात बेसुमार पडलेल्या पावसाच्या खाणाखुणी अजूनही ओसरलेल्या नाहीत. राज्यामध्ये जलसाठ्यात वाढ झाली आहे. एकीकडे राज्याच्या काही भागांमध्ये उदंड प्रमाणात पडलेला असताना, देशाच्या २८ टक्के भागांमध्ये मात्र पावसाची तूट आहे. तर ३९ टक्के भागांत पावसाने दोन महिन्यांची सरासरी गाठण्याचा प्रयत्न केला आहे. उरलेल्या दोन महिन्यांमध्ये तरी या भागांमध्ये पाऊस नीट पडू दे, अशी प्रार्थना नागरिक करत आहेत. देशातील जुलैअखेरपर्यंतच्या सरासरीपेक्षा दोन टक्के पाऊस कमी नोंदला गेला आहे. २९ जुलैच्या सकाळी ८.३० पर्यंत देशात ४२७ मिलिमीटर सरासरी पाऊस पडला आहे आणि सर्वसाधारणपणे अपेक्षित पाऊस ४३३ मिलिमीटर असतो. ही बाब कागदोपत्री दिलासादायक असली, तरी प्रत्यक्षात मात्र दिलासादायक नाही. देशात पूर्व, ईशान्य आणि वायव्य भारताचा काही भाग, तसेच मध्य भारतातील काही राज्यांमध्ये पावसाची तूट आहे. तर ज्या राज्यांमध्ये अतिरिक्त पाऊस पडला आहे, त्यामुळे एकूण सरासरी ही केवळ दोन टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे दिसत आहे. मणिपूर, लडाख येथे पावसाची तीव्र तूट आहे. लडाखमध्ये ६० टक्के, मणिपूर येथे ६२ टक्के पाऊस सरासरीपेक्षा कमी पडला आहे. तर अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड, मेघालय, मिझोरम, त्रिपुरा, चंदीगड, ओडिशा, गुजरात, दमण-दीव, कर्नाटक, केरळ येथे पावसाची तूट आहे. झारखंडमध्ये सरासरीपेक्षा सहा टक्के कमी, उत्तर प्रदेशात सरासरीपेक्षा तीन टक्के कमी, पुड्डुचेरी आणि जम्मू-काश्मीर येथे सरासरीपेक्षा ८ टक्के कमी पाऊस आहे. राजस्थान येथेही सरासरीपेक्षा १८ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. सरासरीच्या श्रेणीमध्ये कर्नाटक, गोवा, दादर-नगर हवेली, पंजाब, उत्तराखंड येथे सरासरी किंवा त्याहून किंचित अधिक पाऊस नोंदला गेला आहे. हरयाणामध्ये ३९ टक्के दिल्लीमध्ये ४१ टक्के, महाराष्ट्रामध्ये २८ टक्के, आंध्र प्रदेशमध्ये ३९ टक्के, तामिळनाडूमध्ये ५५ टक्के पाऊस अतिरिक्त पडला आहे. तर तेलंगणामध्ये देशात सर्वाधिक म्हणजे सरासरीहून ६२ टक्के पाऊस अधिक नोंदला गेला आहे. पुढील दोन आठवड्यांमध्ये महाराष्ट्रातील पाऊस थोडा कमी होण्याचा अंदाज असून वायव्य आणि पूर्व भारतामध्ये पाऊस पडू शकेल. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पश्चिम बंगालजवळ निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे २ ऑगस्टपर्यंत ओडिशा, पश्चिम बंगालमधील गंगेचे खोरे, झारखंड, बिहार, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड येथे अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार स्वरुपाचाही पाऊस असू शकेल.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3BWy0Ev

No comments:

Post a Comment