Breaking

Monday, July 26, 2021

'जिथे मुख्यमंत्री पोहोचले नाहीत, तिथे मनसे पोहोचली' https://ift.tt/3BHN4WG

सातारा : राज्याचे सोमवारी २६ जुलै रोजी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी हेलिकॉप्टरने आले होते. मात्र सातारा आणि कोयनानगर परिसरात सुरू असलेल्या जोरदार पाऊस आणि खराब हवामानामुळे कोयनानगर येथील हेलिपॅडवर हेलिकॉप्टर लँड होऊ शकले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना हेलिकॉप्टरने पुण्याकडे परतावे लागले. या घटनेनंतर मनसेचे नेते यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. 'जिथे मुख्यमंत्री पोहोचले नाहीत तिथे मनसे पोहोचली,' असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे, संदीप देशपांडे यांच्यासह अनेक मनसैनिक सातारा जिल्ह्यात मदत मदतीसाठी धावून आले आहेत. तसेच कोयनानगर येथील दरडी कोसळलेल्या गावांमध्ये भेट देऊन प्रशासनाकडे आपण पाठपुरावा करणार आहोत, असं आश्वासन देखील संदीप देशपांडे यांनी गावकऱ्यांना दिले. नेमकं काय घडलं? मागील पाच दिवस झालेल्या अतिवृष्टीत सातारा जिल्ह्यातील ३७ जणांचा बळी गेला आहे, तर पाटण तालुक्यातील भूस्खलनातील पाच आणि वाई व जावळी तालुक्यातील बेपत्ता झालेल्या चौघा नागरिकांचा शोध अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच भागाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे साताऱ्याला आले होते. मात्र त्यांना खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर लँड न झाल्याने परतावे लागले. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात भूस्खलनामुळे गाडले गेलेल्या लोकांचा शोध अद्यापही सुरूच आहे. अजूनही अंदाजे पाच लोक बेपत्ता आहेत. त्यांच्या शोधासाठी यंत्रणा जोरदार प्रयत्न करत आहे. स्थानिक स्वयंसेवकांसह एनडीआरएफची टीमही दिवस रात्र झटत आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3zBCm23

No comments:

Post a Comment