Breaking

Friday, July 2, 2021

मोठी बातमी: राज्यातील 'हा' जिल्हा करोनामुक्तीच्या उंबरठ्यावर https://ift.tt/3ht7fhR

जळगाव: जिल्ह्यात संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येचा उद्रेक झाला होता. मात्र, ज्या तीव्रतेने संसर्ग वाढला, त्याच गतीने रुग्ण बरेही झाले. जून महिन्यातच जळगाव जिल्ह्यात चार हजारापेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. जून महिन्याच्या सुरुवातीला ५ हजारांवर असलेली सक्रिय रुग्णांची संख्या घटून जूनअखेर ६०० पर्यंत खाली आली आहे. दररोज बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील आता दुहेरी संख्येवर आली आहे. करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या जळगाव शहरात गुरुवारी करोनाचा एकही नवीन बाधित रुग्ण न सापडल्याने आरोग्य यंत्रणेसह नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ( ) वाचा: जळगाव जिल्ह्यात करोना संसर्गाची दुसरी लाट फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झाली. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जळगाव जिल्ह्यात पुन्हा संसर्ग वाढायला सुरुवात झाली. त्यानंतर मार्च व एप्रिल महिन्यात संसर्गाने उच्चांक गाठला होता. या दोन महिन्यांत दररोज हजारावर नवीन बाधित रुग्ण आढळत होते. त्यामुळे आरोग्य सुविधांचा देखील तुटवडा जाणवायला लागला होता. विशेष म्हणजे करोना बाधितांचा आकडा वाढत असताना बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण देखील मार्च व एप्रिल महिन्यात लक्षणीय झाले होते. मे महिन्यापासून घटली रुग्णांची संख्या मार्च व एप्रिल महिन्यात जळगाव जिल्ह्यात करोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येने उच्चांक गाठल्यानंतर मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून घटण्यास सुरुवात झाली. दररोज आढळणाऱ्या नवीन बाधितांची संख्याही कमी होत असताना दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत गेली. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्येचा आलेखही खाली आला. मे महिन्यात जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या दहा हजार पेक्षा जास्त होती. मात्र, मे महिन्याच्या अखेरपर्यंत घटून ती साडेपाच हजाराच्या टप्प्यात आली. त्यापाठोपाठ आलेला जून महिना देखील जळगाव जिल्ह्यासाठी दिलासादायक ठरला. जून महिन्याच्या अखेर साडेपाच हजारावर असलेली सक्रिय रुग्णसंख्या सहाशे पर्यंत खाली आली आहे. वाचा: जिल्ह्यात मार्च व एप्रिल महिन्यात करोना संसर्गाने उच्चांक गाठला असताना हे करोना संसर्गाचा हॉटस्पॉट ठरले होते. जळगाव शहरातील सक्रिय रुग्णसंख्येत देखील जून महिन्यात मोठी घट झाली. गुरुवारी (दि.१ जुलै) जळगाव शहरात एकही करोना रुग्ण आढळला नाही. जळगाव शहरात सध्या फक्त ५४ सक्रिय रुग्ण आहेत. जळगाव जिल्हा आतापर्यंतचे एकूण रुग्ण- १ लाख ४२ हजार ३२१ बरे झालेले रुग्ण- १ लाख ३९ हजार १३८ एकूण सक्रिय रुग्ण- ६१२ बाधित रुग्णांचा मृत्यू- २५७१ वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3dzeLGE

No comments:

Post a Comment