Breaking

Saturday, July 31, 2021

महाराष्ट्रात आता 'झिका'चा धोका; आजाराची सर्व लक्षणे जाणून घ्या... https://ift.tt/3lhfYHl

मुंबई: महाराष्ट्रात विषाणूचा पहिला रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली असतानाच आरोग्य विभागाकडून याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्यातील ज्या महिलेला झिकाची लागण झाली होती ती महिला आता पूर्ण बरी झाली आहे, असे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.( ) वाचा: 'पुणे जिल्ह्यामधील तालुक्यातील गावात झिका विषाणूचा एक रुग्ण आढळून आला आहे. आजाराची लागण झालेली महिला आता पूर्णपणे बरी झाली आहे. तिला तसेच तिच्या कुटुंबातही कोणाला या आजाराची आता काही लक्षणे नाहीत', असे आरोग्य विभागाने पुढे नमूद केले आहे. बेलसर गावातील एका पन्नास वर्षीय महिलेस झिका विषाणूची बाधा झाल्याचा निष्कर्ष दिनांक ३० जुलै २०२१ रोजी प्रयोगशाळेने दिला आहे. हा महाराष्ट्रामध्ये आढळलेला पहिला झिका रुग्ण आहे. ही महिला चिकनगुनिया बाधित देखील असल्याचे स्पष्ट झाल्याने हा मिश्र विषाणू संसर्ग असल्याचे आरोग्य विभागाने पुढे नमूद केले आहे. वाचा: शीघ्र प्रतिसाद पथक बेलसर गावात झिका रुग्ण आढळल्यानंतर तातडीने खबरदारीची पावले उचलण्यात आली आहेत. शनिवारी राज्यस्तरीय शीघ्र प्रतिसाद पथकाने बेलसर गावास भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे, हत्तीरोग विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. कमलापुरकर, राज्य कीटकशास्त्रज्ञ डॉ. महेंद्र जगताप यांचा पथकात समावेश होता. पथकाने सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, पुरंदर तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांची तातडीची बैठक घेऊन त्यांना या भागात झिका रुग्ण आढळल्याने कोणत्या उपाययोजना करायच्या आहेत त्याबाबत सूचनाही दिल्या. झिका आणि इतर किटकजन्य आजारासाठी सर्वेक्षण सक्षम करत असतानाच करोना सर्वेक्षण आणि लसीकरण याकडे दुर्लक्ष होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याबाबतही सर्व संबंधितांना आरोग्य विभागाने निर्देश दिले आहेत. काय आहे झिका आजार? - आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा सौम्य स्वरूपाचा आजार आहे. - झिका आजारात ८० टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. - इतर रुग्णांमध्ये ताप, अंगदुखी, डोळे येणे, अंगावर पुरळ उठणे, सांधेदुखी अशी लक्षणे आढळतात. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3yjgI2a

No comments:

Post a Comment